शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदारांचा वीजपुरवठा खंडित!

By admin | Updated: September 13, 2016 02:52 IST

जुने वीज मीटर बदलून नवीन बसविण्याच्या नावाखाली माजी आमदार विठ्ठलराव शिंदे यांच्या निवासस्थानाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला.

शिरपूर (जैन)(जि. वाशिम), दि. १२ : जुने वीज मीटर बदलून नवीन बसविण्याच्या नावाखाली माजी आमदार विठ्ठलराव शिंदे यांच्या निवासस्थानाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे शिंदे यांच्या कुटुंबियांना चक्क रात्रभर अंधारात राहावे लागले. ११ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या प्रकाराविषयी शिंदे यांनी महावितरणप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली. शिरपूर येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळा शिंदे येथे वीज ग्राहकांचे जुने मीटर काढून नवीन बसविण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे. त्यानुसार, गावामध्ये नवीन मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना वीज कर्मचार्‍यांनी ११ सप्टेंबर रोजी माजी आमदार विठ्ठलराव शिंदे यांच्या निवासस्थानी कुणी हजर नसतानाही जुने मीटर काढून नवीन मीटर बसविले; मात्र या मीटरमधून वीज प्रवाह सुरू न केल्याने शिंदे व त्यांच्या कुटुंबियांना ११ सप्टेंबरची रात्र अंधारात काढावी लागली. अगोदरच गावात तापाचे रुग्न वाढत असताना वीज कर्मचार्‍यांनी घरी कुणी नसताना केलेल्या या कामाबद्दल शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. ११ सप्टेंबर रोजी मी, वडील आणि कुटुंबातील कुणीच घरी नसताना महावितरणने मीटर बदलले. यामुळे अंधारात राहावे लागले, असे गजानन शिंदे यांनी सांगितले.