आणखी पाच जणांचा मृत्यू; ११० कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 18:30 IST2021-06-01T18:29:55+5:302021-06-01T18:30:06+5:30
coronavirus in washim : १ जून रोजी आणखी पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ११० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

आणखी पाच जणांचा मृत्यू; ११० कोरोना पॉझिटिव्ह
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून, मंगहवार १ जून रोजी आणखी पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ११० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४०१७३ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते. मंगळवारी नव्याने ११० रुग्ण आढळून आले, तर २७० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आणखी पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंदही मंगळवारी पोर्टलवर घेण्यात आली. जिल्ह्याबाहेरील ७ बाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ५८३ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, बाजारपेठेत तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
१९९३ सक्रिय रुग्ण
मंगळवारच्या अहवालानुसार नव्याने ११० रुग्ण आढळून आले तर २७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण १९९३ रुग्ण सक्रिय आहेत.