शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

शाळेची पहिली घंटा आज वाजणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:52 AM

सोमवारपासून शाळेत चार तास शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे मिळणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनामुळे तब्बल आठ महिन्यानंतर सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. पालकांचे संमतीपत्र मिळालेल्या नववी ते बारावीतील जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांना सोमवारपासून शाळेत चार तास शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे मिळणार आहेत.यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. आॅक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले. त्यानुसार मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळा सोमवार, २३ नोव्हेंबरपासून गजबजणार आहेत. जिल्ह्यात नववी ते बारावीत जवळपास ६६ हजार विद्यार्थी संख्या असून २५५१ शिक्षक संख्या आहे. याशिवाय १६६८ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली असल्याने स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समिती, शाळा प्रशासन व मुख्याध्यापक हे शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. ज्या शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता, हॅण्डवॉश व अन्य अनुषांगिक दृष्टीने तयारी  पूर्ण झाली असेल, त्याच शाळा पहिल्या दिवशी उघडणार आहेत. तयारी पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत शाळा उघडणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. चार तासिकांसाठी वर्ग सुरू राहणार असून, प्राधान्यक्रमाने इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिकविले जाइल.

इतिहास, भूगोल, संस्कृत, अर्थशास्त्र विषयाचे धडे दिले जाणार ऑनलाईनइतिहास, भूगोल, संस्कृत तसेच अर्थशास्त्र विषयाचे धडे विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने दिले जाणार आहेत. शाळा सुरू झाल्यावर रोज तीन ते चार तास अध्ययन होणार असून, एक तासिका ४० मिनिटांची राहणार आहे. विशेष म्हणजे मुलांना जेवनाची सुटी राहणार नाही.

इंग्रजी, गणित, विज्ञान, भाषा विषयांसाठी जावे लागणार शाळेतचार तासिका होणार असल्याने यामध्ये प्राधान्याने इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यानंतर उर्वरीत एका तासिकेमध्ये मराठी, हिंदी या विषयाचे धडे दिले जाणार आहे. संमतीपत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष वर्गात शिकविण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा