चिंचखेडा येथे गोठ्याला आग; दोन लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 18:26 IST2019-04-07T18:26:32+5:302019-04-07T18:26:54+5:30

मंगरूळपीर (वाशिम) - मंगरुळपीर तालुक्यातील चिंचखेडा येथील राजाराम कोरडे यांच्या गोठ्याला आग लागून दोन लाखांचे साहित्य व चारा जळून खाक झाल्याची घटना ७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेदरम्यान घडली.

Fire at Chinchkheda; Two lakh losses | चिंचखेडा येथे गोठ्याला आग; दोन लाखाचे नुकसान

चिंचखेडा येथे गोठ्याला आग; दोन लाखाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर (वाशिम) - मंगरुळपीर तालुक्यातील चिंचखेडा येथील राजाराम कोरडे यांच्या गोठ्याला आग लागून दोन लाखांचे साहित्य व चारा जळून खाक झाल्याची घटना ७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेदरम्यान घडली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे.
चिंचखेडा येथे राजाराम कोरडे यांच्या गोठ्याला अचानक लागल्याची माहिती मिळताच, आग विझविण्यााठी ग्रामस्थांची धावपळ उडाली. ग्रामस्थांनी एकजूट दाखविल्यामुळे आग आटोक्यात आली. पोलिस आणि अग्निशमन यंञणेलाही पाचारण करण्यात आले होते. परंतु तोपर्यत आगीत दोन लाखावर साहित्य व चारा जळून खाक झाला. या आगीत सुदैवाने जीवितहानी नाही.

Web Title: Fire at Chinchkheda; Two lakh losses