पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीविरूद्ध गुन्हा दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 14:03 IST2018-05-25T14:03:00+5:302018-05-25T14:03:00+5:30

शिरपूर जैन : एका विवाहित महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत २४ मे रोजी सायंकाळच्या सुमारास शिरपूर येथे आढळून आला होता.

FIR against husband for killing wife! | पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीविरूद्ध गुन्हा दाखल !

पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीविरूद्ध गुन्हा दाखल !

ठळक मुद्दे सुनिता हीचा विवाह ५ वर्षापुर्वी रिसोड तालुक्यातील भापुर येथील धनंजय बोडखे यांच्याशी झाला होता. पतीकडून होणाºया या त्रासामुळे फिर्यादीने मृतक सुनिता हिला मुलीसह माहेरी राहावयास आणले होते.   सहा महिन्याच्या मुलीसाठी बांधण्यात आलेल्या झोक्याला गळफास लागलेल्या स्थितीत आढळुन आला.

शिरपूर जैन : एका विवाहित महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत २४ मे रोजी सायंकाळच्या सुमारास शिरपूर येथे आढळून आला होता. याप्रकरणी मृतक महिलेच्या वडीलांनी फिर्याद दिल्याने मृतक महिलेच्या पतीविरूद्ध विविध कलमान्वये गुरूवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले.

शिरपूर येथील जगन्नाथ काठोळे यांची मुलगी सुनिता हीचा विवाह ५ वर्षापुर्वी रिसोड तालुक्यातील भापुर येथील धनंजय बोडखे यांच्याशी झाला होता. सुनिताला तिन मुली आहेत. याप्रकरणी जगन्नाथ भिवाजी काठोळे (५२) रा. शिरपूर यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी धनंजय बोडखे हा मृतक सुनिताला तुला मुलीच का होतात, या कारणाहून नेहमी मारहाण करून त्रास देत होता. पतीकडून होणाºया या त्रासामुळे फिर्यादीने मृतक सुनिता हिला मुलीसह माहेरी राहावयास आणले होते.  २४ मे च्या सायंकाळी ७ वाजता सुनिताचा मृतदेह हा, तिच्या सहा महिन्याच्या मुलीसाठी बांधण्यात आलेल्या झोक्याला गळफास लागलेल्या स्थितीत आढळुन आला. आरोपीने सुनिताच्या गळ्यास फास लावून जिवाने मारून टाकले व गळफास घेतल्याचा देखावा निर्माण केला, असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले. यावरून आरोपी पती धनंजय बोडखे याच्याविरूद्ध भादंवी कलम ४९८ अ, ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी प्रभारी पोलिस निरीक्षक ए.आर.राठोड, पी.एस.आय. गणेश मुपडे करीत आहेत.

Web Title: FIR against husband for killing wife!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.