कारंजात संपत्तीच्या कारणावरून हाणामारी; सातजण गंभीर जखमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 16:46 IST2019-01-12T16:45:58+5:302019-01-12T16:46:55+5:30
कारंजा लाड (वाशिम) : संपत्तीच्या कारणावरून एकाच कुटंूबातील सदस्यांमध्ये वाद होवून झालेल्या हाणामारीत २ महिलांसह ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, १२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास कारंजा शहरातील सिंधीकॅम्पध्ये घडली.

कारंजात संपत्तीच्या कारणावरून हाणामारी; सातजण गंभीर जखमी!
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : संपत्तीच्या कारणावरून एकाच कुटंूबातील सदस्यांमध्ये वाद होवून झालेल्या हाणामारीत २ महिलांसह ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, १२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास कारंजा शहरातील सिंधीकॅम्पध्ये घडली. या घटनेत घरातील साहित्याचीही जाळपोळ करण्यात आली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, कारंजा येथील सिंधी कॅम्पमधील छद्दानी कुटूंबात संपत्तीच्या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत होवून २ महिलांसह एकंदरित ७ जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये कन्हय्यालाल छद्दानी (वय ७५ वर्षे), ओमप्रकाश छद्दानी (वय ३८ वर्षे), दिपक छद्दानी (वय ४० वर्षे), रामीबाई कन्हैय्यालाल छद्दानी (वय ७० वर्षे), हर्षा दिपक छद्दानी (वय ३८ वर्षे), महक ओमप्रकाश छद्दानी (वय ३० वर्षे), जितेंद्र ओमप्रकाश छद्दानी (वय २५ वर्षे)यांचा समावेश आहे. दरम्यान घटनेतील गंभीर जखमींवर कारंजा येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला व वर्धा येथे पाठविण्यात आले.