दिघी येथे भीषण आग; तीन घरांची राखरांगोळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 17:27 IST2019-03-30T17:27:46+5:302019-03-30T17:27:53+5:30

उंबर्डाबाजार (वाशिम) : येथून जवळच असलेल्या ग्राम दिघी येथे एका घरात गॅस-सिलिंडरचा स्फोट झाल्याने त्या घरासह अन्य दोन अशा तीन घरांची अक्षरश: राखरांगोळी झाली.

A fierce fire at Dighi; Three houses charred | दिघी येथे भीषण आग; तीन घरांची राखरांगोळी!

दिघी येथे भीषण आग; तीन घरांची राखरांगोळी!

 
लोकमत न्यूज नेटवर्क
उंबर्डाबाजार (वाशिम) : येथून जवळच असलेल्या ग्राम दिघी येथे एका घरात गॅस-सिलिंडरचा स्फोट झाल्याने त्या घरासह अन्य दोन अशा तीन घरांची अक्षरश: राखरांगोळी झाली. ३० मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत रोख रकमेसह लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, दिघी येथे वास्तव्यास असलेले चरण ढळे यांच्या घरातील गॅस-सिलिंडरचा शनिवारी दुपारी अचानक भीषण स्फोट झाला. यात त्यांचे घर व लागून असलेल्या विजय ढळे व प्रमोद ढळे यांच्या घरांना आगीने कवेत घेतले. या घटनेत चरण ढळे यांच्या घरातील गहू, तूर या शेतमालाच्या पोत्यांसह हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल, कापूस विकून आलेली रोख रक्कम, फ्रिज, शिलाई मशीन, गॅस-सिलिंडर, शेगडी, पेट्रोल फवारणी यंत्र यासह संसारोपयोगी साहित्य तसेच विजय ढळे व प्रमोद ढळे यांच्या घरातीलही लाखो रुपये किमतीचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. घटनेची वार्ता गावात पसरताच गावकºयांनी आग विझविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले. कारंजा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने देखील विनाविलंब घटनास्थळ गाठून आग विझविण्याकामी पुढाकार घेतला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Web Title: A fierce fire at Dighi; Three houses charred