Father's Day Special : आई गेली देवाघरी, निवृत्तीच मुक्या मुलीचा सांभाळ करी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 12:13 PM2021-06-20T12:13:04+5:302021-06-20T12:13:36+5:30

Father's Day Special : वडिलांनी मुलांना सावत्रपणाची वागणूक मिळू नये, यासाठी दुसरे लग्न केले नाही.

Father's Day Special: Mother went to Devaghari, took care of her mute daughter after retirement! | Father's Day Special : आई गेली देवाघरी, निवृत्तीच मुक्या मुलीचा सांभाळ करी!

Father's Day Special : आई गेली देवाघरी, निवृत्तीच मुक्या मुलीचा सांभाळ करी!

googlenewsNext

- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  ती जन्मजात मुकी आहे, तिच्याकडून हात आणि डोळ्यांव्दारे केल्या जाणाऱ्या इशाऱ्यांवरूनच तिला काय हवे, हे समजून घ्यावे लागते. अशा स्थितीत ती १० वर्षांची असतानाच तिच्या आईने जगाचा निरोप घेतला. वडिलांनी मुलांना सावत्रपणाची वागणूक मिळू नये, यासाठी दुसरे लग्न केले नाही. धीर खचू न देता मुलीचा मोठ्या आत्मीयतेने सांभाळ केला. निवृत्ती आळणे (वाशिम) असे नाव असलेल्या त्या वडिलांचे काैतुक करावे तेवढे कमीच आहे.
दाढी-कटिंगचा व्यवसाय असलेल्या निवृत्ती आळणे यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यापैकी बाली नावाच्या मुलीला जन्मपासूनच बाेलता येत नाही. इतर दोन मुले धडधाकट आहेत. निवृत्ती आळणे यांनी स्वत:च्या सुखाचा विचार न करता तिन्ही मुलांचा सांभाळ केला. मुलीला चांगले स्थळ शोधून तिचे लग्न लावून दिले; तर मुलाचेही लग्न झाले असून तो पुणे येथे पत्नी, मुलांना घेऊन वास्तव्य करीत आहे. मुक्या असलेल्या बालीचेही एका पायाने दिव्यांग व मुक्या मुलासोबत लग्न झाले होते; मात्र नवरा मारझोड करणारा निघाला. त्यामुळे कालांतराने विभक्त व्हावे लागले. तेव्हापासून बापाला मुक्या मुलीचा आणि तिला वडिलांचाच आधार आहे. 
निवृत्ती आळणे यांना उतारवयामुळे दाढी-कटिंगचे काम करता येणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गळत असलेल्या मोडक्यातोडक्या घरात वास्तव्य करीत असताना शासनाकडून निराधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर बाप-लेकींचा उदरनिर्वाह सुरू आहे. अधूनमधून मानधन लांबल्यास दोघांवरही उपासमारीची वेळ ओढवते. आजारी पडल्यास दवाखान्यासाठी पैसे नसतात. असे असतानाही ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा’, याप्रमाणे निवृत्ती आळणे स्वत:सोबतच मुलीचा सांभाळ करीत आहेत.

Web Title: Father's Day Special: Mother went to Devaghari, took care of her mute daughter after retirement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.