Father rapes his daughter in Washim | नराधम बापाचा स्वत:च्या मुलीवर बलात्कार
नराधम बापाचा स्वत:च्या मुलीवर बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील एका नराधम बापाने स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासली. याप्रकरणी पिडितेच्या आईने वाशिम शहर पोलिसांत बुधवार, ११ डिसेंबरच्या रात्री दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीस बापावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करून त्यास अटक केली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, वाशिम येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीच्या बापाने गत काही दिवसांपासून वारंवार बलात्कार केला. जिवाच्या भीतीने पिडित मुलीने कुणाकडेही वाच्यता न केल्याने बापाचे मनोबल वाढले. दरम्यान, याबाबत आईला संशय आल्याने तीने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, पीडितेने आईजवळ बापाचा हा घृणास्पद प्रकार कथन केला. त्यानंतर पिडितेच्या आईने शहर पोलीस स्टेशन गाठून पतीविरूद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी आरोपी बापावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करून त्यास अटक केली. पुढील तपास वाशिम शहर पोलिस करित आहे.

Web Title: Father rapes his daughter in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.