हमीभावापेक्षा शेतमालाच्या दरात एका हजाराने घसरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 02:57 PM2019-11-30T14:57:08+5:302019-11-30T14:59:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : शासनाने जाहिर केलेल्या हमीभावापेक्षा जवळपास एक हजार रुपये कमी दराने बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, मूग ...

Farming rates by a thousand less than guaranteed | हमीभावापेक्षा शेतमालाच्या दरात एका हजाराने घसरण!

हमीभावापेक्षा शेतमालाच्या दरात एका हजाराने घसरण!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाने जाहिर केलेल्या हमीभावापेक्षा जवळपास एक हजार रुपये कमी दराने बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, मूग या शेतमालाची खरेदी केली जात आहे. प्रति क्विंटल एक हजार रुपयाचे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
यावर्षी सुरुवातीपासून निसर्गाची अवकृपा झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. मृग नक्षत्रात वेळेवर हजेरी न लावणाºया पावसाने त्यानंतरही सातत्य ठेवले नाही. ऐन सोंगणीच्या काळात अवकाळी पावसाने सोयाबीनचे नुकसान केले. जिल्ह्यात यावर्षी जवळपास पावणे तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली होती. सोयाबीनची आवक वाढताच बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव यावर्षीही शेतकºयांना आला आहे. सोयाबीनला ३७१० रुपये प्रती क्विंटल, मूगाला ७०५० रुपये प्रती क्विंटल, उडदाला ५७०० रुपये प्रती क्विंटल असा हमीभाव आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढताच बाजारभाव २२०० ते ४००० रुपयादरम्यान स्थिरावले आहेत. सोयाबीनला सरासरी २७०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत असल्याने हमीभावापेक्षा एक हजार रुपये आर्थिक नुकसान हे प्रति क्विंटलवर सहन करावे लागत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया देऊळगाव बंडा येथे सोनुबाबा सरनाईक, चिखली येथील गौतम भगत, सोनगव्हाण येथील रमेश पाईकराव या शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. मूगाला ७०५० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव असतानाही सरासरी ५८०० रुपये दर मिळत आहे. यामुळे शेतकºयांना जवळपास १२०० रुपये कमी दर मिळत आहे. ही बाब शेतकºयांसाठी आर्थिक नुकसानाची ठरत आहे.
 

शेतमालाची प्रतवारी घसरल्याने अडचणी
अवकाळी पावसामुळे बहुतांश ठिकाणी सोयाबीन या शेतमालाची प्रतवारी घसरली आहे. शासकीय खरेदी केंद्रावर मात्र एफएक्यू दर्जाचा शेतमालच हमीभावात खरेदी केला जातो. त्यातही शेतमालाची चाळणी करून मोजणी होते. शिवाय या केंद्रावर विक्री केलेल्या शेतमालाचे चुकारे विलंबाने मिळतात. या सर्व बाबीचा परिणाम म्हणून अनेक शेतकरी बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी नेत आहेत, बाजार समित्यांमध्ये हमीभावानुसार खरेदी नसल्याने शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.


हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करू नये अशा सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत. शेतकºयांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
-रमेश कटके
जिल्हा उपनिबंधक, वाशिम

Web Title: Farming rates by a thousand less than guaranteed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.