Farmers will get 'pension card' only after registration is completed. | नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच मिळणार शेतकऱ्यांना ‘पेन्शन कार्ड’

नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच मिळणार शेतकऱ्यांना ‘पेन्शन कार्ड’


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेसाठी नाव नोंदणी सुरू असून, नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच शेतकऱ्यांना ‘पेन्शन कार्ड’ मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी २४ आॅगस्ट रोजी स्पष्ट केले.
प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यातील १८ ते ४० वयोगटातील सर्व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र असून सामाईक सुविधा केंद्रावर नोंदणी केली जात आहे. २४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी मोडक यांनी मानोरा तालुक्यातील शेंदूजना आढाव, उज्ज्वल नगर, फुलउमरी, पाळोदी, मानोरा, साखरडोह तसेच मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी, हिसई, शेलुबाजार येथे आयोजित शिबिरांना भेट देऊन शेतकºयांशी संवाद साधला. तसेच नोंदणी पूर्ण झालेल्या शेतकºयांना पेन्शन कार्ड वितरित केले. यावेळी मंगरुळपीरचे तहसीलदार किशोर बागडे, मानोराचे तहसीलदार सुनील चव्हाण, गट विकास अधिकारी सूरज गोहाड यांच्यासह मानोरा व मंगरुळपीर तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, १ आॅगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. नोंदणीनंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून लाभार्थी हिश्याची रक्कम आॅटो-डेबीटने विमा कंपनीकडे जमा होईल. नाव नोंदणीसाठी शेतकºयांनी आधारकार्ड, ८ अ व बँक पासबुक, बँक खाते क्रमांक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव इत्यादी माहिती सोबत आणणे आवश्यक आहे. शेतकºयांची पडताळणी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे होणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचे पेन्शन कार्ड मिळणार आहे, असे मोडक यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Farmers will get 'pension card' only after registration is completed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.