शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

दोन मंत्र्यांची भेट घेऊनही टळली नाही शेतकर्‍याची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 02:54 IST

मानोरा (वाशिम): कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाजकल्याण मंत्री राजकुमार  बडोले यांची २७ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन आत्महत्येचा इशारा दिल्यानंतरही,  कोणत्याही उपाययोजना न करण्यात आल्याने मानोरा तालुक्यातील सोयजना येथील  शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी अखेर ६ डिसेंबर रोजी यवतमाळ येथे आ त्महत्या केली. मंत्र्यांच्या भेटीसाठी ज्ञानेश्‍वर मिसाळ यांच्यासोबत गेलेले सोयजना  येथील शेतकरी आत्माराम चव्हाण यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. 

ठळक मुद्देसोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी ६ डिसेंबर रोजी यवतमाळ  येथे केली आत्महत्याआत्महत्येचा इशारा दिल्यानंतरही, कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीतमंत्र्यांच्या भेटीसाठी मिसाळ यांच्यासोबत गेलेले शेतकरी आत्माराम चव्हाण यांनी  केला खळबळजनक खुलासा 

बबन देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांची २७ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन आत्महत्येचा इशारा दिल्यानंतरही,  कोणत्याही उपाययोजना न करण्यात आल्याने मानोरा तालुक्यातील सोयजना येथील  शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी अखेर ६ डिसेंबर रोजी यवतमाळ येथे आत्महत्या केली. मंत्र्यांच्या भेटीसाठी ज्ञानेश्‍वर मिसाळ यांच्यासोबत गेलेले सोयजना  येथील शेतकरी आत्माराम चव्हाण यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. प्रगतशील शेतकरी म्हणून मानोरा तालुक्यात ओळख असलेले सोयजना येथील शे तकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी आत्महत्येपूर्वी वेगवेगळी चार पत्रे लिहून  ठेवली आहेत. दोन्ही मुलांसाठी लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की ते  जगाला ओळखू शकले नाहीत, ‘‘तुम्ही लोकांना ओळखा आणि आईचा सांभाळ  करा. आई नारळासारखी आहे. वरून कठोर असली, तरी आतून गोड आहे,’’  असेही त्यांनी सांगितले. ज्ञानेश्‍वर मिसाळ यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. त्यामध्ये  आयसीआयसीआय बँकेचे तीन लाख, महिंद्रा फायनान्सचे अडीच लाख आणि  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दीड लाख रूपयांच्या कर्जाचा समावेश आहे. त्याशिवाय  त्यांनी खासगी कर्जही घेतले होते. त्यांनी २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात  जाऊन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाज कल्याण मंत्री राजकुमार  बडोले यांची भेट घेतली आणि त्यांना आपबिती कथन केली. खुर्चीत बसून शे तकर्‍यांच्या व्यथा कळणार नाहीत आणि समस्याही सुटणार नाहीत, असे परखड  बोल मंत्र्यांना सुनावत त्यांनी आत्महत्या करणार असल्याचा इशाराही दिला, मात्र  मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे निराश होऊन मिसाळ  यांनी आत्महत्या केली. तीन ते चार वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे सतत ना िपकी होत असल्याने कर्ज फेडण्याची चिंता त्यांना सतावत होती. त्यांचा मोठा मुलगा  शेती सांभाळतो. तर लहान मुलगा सागर याने बीएससीची पदवी घेतल्यावर त्याचे  प्रमाणपत्र आणण्यासाठीसुद्धा ज्ञानेश्‍वर मिसाळ यांच्याकडे पैसे नव्हते. ज्ञानेश्‍वर  मिसाळ यांच्याकडे असलेल्या आठ एकर शेतीमधील संत्रा बाग पावसाअभावी  सुकली आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसायासाठी पैसे गुंतविले.  त्यासाठी आणखी पैसे हवे असल्याने त्यांनी कोकण ग्रामीण बँकेकडे अर्जही केला;  परंतु कर्ज मिळू शकले नाही, त्यामुळे ते चिंताग्रस्त होते. त्यांनी अखेर आत्महत्येचा  मार्ग अवलंबला. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या