कमी दाबाच्या विद्युत पुरवठयामुळे शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 17:22 IST2018-11-10T17:22:18+5:302018-11-10T17:22:55+5:30
कारंजा : तालुक्यातील ग्राम महागाव लोहगाव परिसरात गेल्य एक महिन्यापासून कमी दाबाच्या विद्युत पुरवठयामुळे ग्रामस्थ तथा शेतकरी मडळी त्रस्त झाली असून विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराप्रंती ग्राहकात असंतोष निर्माण होत आहे

कमी दाबाच्या विद्युत पुरवठयामुळे शेतकरी त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : तालुक्यातील ग्राम महागाव लोहगाव परिसरात गेल्य एक महिन्यापासून कमी दाबाच्या विद्युत पुरवठयामुळे ग्रामस्थ तथा शेतकरी मडळी त्रस्त झाली असून विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराप्रंती ग्राहकात असंतोष निर्माण होत आहे
कारंजा तालुक्यातील ग्राम भडशिवणी येथील विद्युत सबस्टेशनवरून भडशिवणी ते पलाना या मुख्यवाहीनीवरुन परिसरातील गावे जोडली आहेत. त्यामध्ये काजळेश्वर महागाव, लोहगाव , जानोरी, कसारखेड, मोरहळ, चिंचखेड आदींचा समावेश आहे.
मुख्य विद्युत वाहीनीवरून या गावामधी विद्युत वाहीनीवर कम दाबाचा विज पुरवठा गेल्या एक महिन्यापासून सुरु आहे तसेच दिवसभरातनू अनेकदा विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होण्याचे प्रकार घडत आहे.त्यामुळे त्या गावामधील पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्या आहे.
याबाबत अनेकदा विद्युत वितरण कंपनी कारंजा कार्यालयाकडे लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्यानंतरही त्याची दखल घेण्यात येत नाही या गावामध्ये कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्यामुळे शेतकºयांच्या शेतातील विद्युत पंपावरून पिकांना पाणी पुरवठा करणे सुद्धा बंद आहे. दिवसा व रात्रीसुद्धा कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थ नागरिक त्रस्त झाले आहेत. करिता संबंधितांनी या बाबीची दखल घेवून भडशिवणी ते पलाना या विजपुरवठा करणºया मुख्य वाहीनीची तात्काळ दुरुस्ती करावी ग्रामस्थ व शेतकºयांना योग्य दाबाचा विज पुरवठा करावा अशी मागणी शेकडो नागरिकांनी केली आहे.
भारनियमनमुळे नागरिकांमध्ये रोष
वाशिम : जिल्हयाला दुष्काळाच्या कळा लागल्या असल्याचे अधोरेखीत झाले असतानाही महावितरणने जिल्हाभरात भार नियमन सुरु केले . या भारनियमनामुळे नागरिक मेटाकुटीला आले असलेले दिसत आहेत, मात्र महावितरणला त्याचे काही देणे घेणे नसल्याने जिल्हावासीयांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत असून महावितरणने तात्काळ भारनियमन थांबवावे अशी मागणी जिल्हाभरातून होत आहे.