शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ; बँकांमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 4:11 PM

बँकांसमोर नागरिकांची गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम तोंडावर आल्याने पीककर्ज काढण्यासाठी शेतकºयांची विविध बँकांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. शेतकºयांप्रमाणेच विविध योजनेंतर्गतचे लाभार्थीही अनुदान काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करीत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे रिसोड, मानोरा व किन्हीराजा येथे ३ जून रोजी दिसून आले.रिसोड : खरीप पीककर्ज काढण्यासाठी तसेच विविध योजनेंतर्गत बँकेत जमा झालेले अनुदान काढण्यासाठी नागरिकांची ३ जून रोजी राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँकेत गर्दी झाल्याचे दिसून आले. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी बँकांसमोर गर्दी करू नये असे आवाहन तालुका  प्रशासनातर्फे वारंवार करण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी बँकेची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ४ अशी करण्यात आली. तथापि, बँकांमधील गर्दी कमी होत नसल्याचे ३ जून रोजीही दिसून आले. बँकेत गर्दी होऊ नये म्हणून बँकांसमोर आता पांढºया रंगात वर्तुळी रंगविण्यात आले नाही. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन झाले नसल्याचेही दिसून आले.किन्हीराजा : किन्हीराजा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असून, येथे विविध कामांसाठी नागरिकांची बँकेत गर्दी होत असल्याचे ३ जून रोजी दिसून आले. खते, बियाण्यांची जूळवाजूळव करण्यासाठी नागरिकांना पैशाची गरज असून, पीककर्ज काढण्यासाठी शेतकºयांची एकच धावपळ होत असल्याचे किन्हीराजा परिसरात दिसून येते.  बँकांसमोर नागरिकांची गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.मानोरा : मानोरा तालुक्यात एक जण कोरोनाबाधित असल्याचे ३ जून रोजी स्पष्ट झाले. तथापि, बँकांमधील व बँकांसमोरील गर्दी कमी होत नसून नागरिक बिनधास्त असल्याचे ३ जून रोजी दिसून आले. कोरोनाचा धोका अजून संपलेला नसून, नागरिकांनी विशेष काळजी व दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा तसेच तालुका प्रशासनातर्फे वारंवार करण्यात आले. परंतू, याकडे दुर्लक्ष करीत नागरिक बँकांमध्ये गर्दी करीत असल्याचे तसेच बँक प्रशासनाही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करीत नसल्याचे बुधवारी दिसून आले.

टॅग्स :washimवाशिमbankबँकFarmerशेतकरी