कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 19:48 IST2017-09-06T19:47:28+5:302017-09-06T19:48:02+5:30
कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी आसेगाव (पो.स्टे.) परिसरातील सेतु केंद्रांवर शेतकºयांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव (पो.स्टे.) - कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी आसेगाव (पो.स्टे.) परिसरातील सेतु केंद्रांवर शेतकºयांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानास पात्र ठरणाºया शेतकºयांना आॅनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. १५ सप्टेंबर अंतिम मुदत असून, मुदतीच्या आत अर्ज सादर करण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याची त्रासदायक अट ठेवल्याबद्दल शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे. ‘आपले सरकार सेवा केंद्रा’चे संकेतस्थळ अनेकदा व्यस्त राहत असल्याने एक अर्ज भरण्यासाठी शेतकºयांचा बराच वेळ जातो. त्यामुळे सेतू केंद्रात कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांच्या रांगा लागत आहेत. आसेगाव परिसरातील बहुतांश शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरता आले नाहीत.