शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

शेतकरी दुहेरी संकटात; पिकांवर किडींचा प्रकोप, फवारणीही ठरतेय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 2:23 PM

फवारणी केली नाही, तर पिके हातची जातील आणि फवारणी करावी, तर जीव धोक्यात येईल, त्यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकरी आणि शेतमजुरांसमोरही उपस्थित होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क उंबर्डा बाजार (वाशिम) : रिमझीम पावसामुळे खरीप पिके बहरत असतानाच या पिकांवर विविध किडींचा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावर नियंत्रणासाठी शेतकरी कीटकनाशक फवारणी करीत आहेत; परंतु कीटकनाशक फवारणी करताना विषबाधेची भिती आहेच शिवाय पिक मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने या पिकांतील सरपटणाºया प्राण्यांचाही संचार आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांसमोर दुहेरी संकट ओढवल्याचे दिसत आहे.कारंजा तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तथापि, गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडत असलेला रिमझीम पाऊस पिकांसाठी फायदेशीर ठरत असला तरी, याच पावसामुळे पिकांवर विविध किडींचा प्रादूर्भाव होत आहे. सोयाबीनसह कपाशीवर मावा, कोकडा, पांढरी माशी, उंटअळी, पाने खाणाºया अळीचा मोठा प्रादूर्भाव झालेला आहे. त्यामुळे शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. तथापि, रिमझीम पावसामुळे पिकांची उंची वाढली असून, शिवार दाट झाले आहे. या पिकांत साप, विंचू आदि सरपटणाºया घातक प्राण्यांचा संचारही वाढला आहे. कमरेच्यावर वाढलेल्या पिकांत फवारणी करताना पंपवर धरावा लागतो. अशात थोडाही वारा आला की, फवारणीचे औषध शेतमजुर, शेतकºयाच्या नाका, तोंडाकडे उडते. त्यामुळे विषबाधेची भिती आहे, तर हा धोका टाळण्याचा प्रयत्न करीत असताना खाली सरपटणाºया प्राण्यांकडे लक्ष राहत नाही. कीटकनाशक फवारणी केली नाही, तर पिके हातची जातील आणि फवारणी करावी, तर जीव धोक्यात येईल, त्यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकरी आणि शेतमजुरांसमोरही उपस्थित होत आहे. 

फवारणी करताना शेतमजूराच्या पायाला गुंडाळला सापउंबर्डा बाजार: सोयाबीन पिकांवरील किडीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतात फवारणी करणाºया शेतमजुराच्या पायालाच साप गुंडाळल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी उंबर्डा बाजार परिसरात घडली. नशिब बलवत्तर म्हणून शेतमजुराच्या लक्षात आल्याने त्याने शेताबाहेर धाव घेतल्याने त्याचा जीव वाचला. दुसºया दिवशी दुसरा शेतमजूर आणि शेतकरी हळदे यांना पुन्हा शेतात मोठा साप दिसला. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण, रिमझीम पावसामुळे खरीप पिकांवर किडींचा प्रादूर्भाव झाला आहे. या किडीवर नियंत्रणासाठी उंबर्डा बाजार येथील शेतकरी वसंतराव हळदे यांनी सोयाबीन पिकावर कीटकनाशक फवारणीचे काम शेतमजुराला दिले. हा शेतमजूर ७ सप्टेंबर रोजी फवारणी करीत असताना दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक पायावर काही भार पडल्याचे जाणवले. त्याने पाहिले असता पायाला मोठा साप गुंडाळल्याचे दिसले. त्याने लगेच पाय झटकून शेताबाहेर पळ काढला. सुदैवाने सापाने त्याच्या पायाला चावा घेतला नाही. त्यामुळे त्याने फवारणीच सोडून दिली. विशेष म्हणजे दुसºया दिवशी वसंतराव हळद हे दुसºया शेतमजुला घेऊन फवारणीसाठी गेले. त्यावेळीही दोघांना मोठा साप दिसला. त्यामुळे दोघांनीही शेतातून पळ काढला.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी