कर्जमाफीपासून वंचित शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 16:59 IST2019-07-29T16:59:16+5:302019-07-29T16:59:30+5:30
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी बचाव संघर्ष संघटनेचे पदाधिकारी २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.

कर्जमाफीपासून वंचित शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात
वाशिम - पीककर्ज माफिपासून जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित असून, याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी बचाव संघर्ष संघटनेचे पदाधिकारी २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.
शेतकऱ्यांना नानाविध संकटातून जावे लागत आहे. २०१७ मध्ये पीक कर्जमाफीची घोषणा झाली. परंतू वाशिम जिल्हयातील काही शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही. तसेच जांब अढाव येथील शेतकऱ्यांच्यादेखील अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरीा बचाव संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश अढाव व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जांब येथील अनेक शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही, कर्ज पुनरगठन व चालू पीक कर्ज याबाबत दिरंगाई आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी रूषिकेश मोडक व जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांना निवेदन दिले. जिल्हा उपनिबंधक कटके यांच्याशी सविस्तर चर्चा करून तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी व संबंधीत शेतकरी बांधवांचा संभ्रम दूर करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली.