शेतमालाच्या किमतीबाबत शेतक-यांत नाराजी
By Admin | Updated: June 17, 2015 02:07 IST2015-06-17T01:55:44+5:302015-06-17T02:07:45+5:30
शेती व्यवस्थापनापासून शेतकरी अनभिज्ञ ;एमआरपीपेक्षा खत व बियाण्यांचे जादा दर.

शेतमालाच्या किमतीबाबत शेतक-यांत नाराजी
वाशिम : कमी पाऊस, अतवृष्टी, रोगराई, वन्यप्राण्यांचा हैदोस या सर्व कठीण परिस्थितीतून घरात आलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याची खंत ८७ टक्के शेतकर्यांनी ह्यलोकमतह्णच्या सर्वेक्षणादरम्यान व्यक्त केली. पीकपेरणीचा हंगाम लक्षात घेऊन ह्यलोकमतह्णतर्फे १६ जून रोजी ठराविक प्रश्नांवर शेतकर्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. शेतीमध्ये आमुलाग्र बदल होत आहेत. या बदलामध्ये अनेक शेतकरी सहभागी होऊन अधिकाधिक उत्पादन घेत आहेत तर दुसरीकडे बरेच शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करीत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले. शेती व्यवस्थापनानुसार शेती करता काय? या प्रश्नावर ३६ टक्के शेतकर्यांनी होय असे उत्तर दिले तर ६४ टक्के शेतकर्यांनी नाही असे मत नोंदविले. शेतीत सिंचनाची सुविधा आहे काय? या प्रश्नावर ३९ टक्के शेतकर्यांनी सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे असे मत नोंदविले तर ६१ टक्के शेतकर्यांनी सिंचनाची सुविधा नसल्याचे मत नोंदविले. सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे ६१ टक्के शेतकर्यांनी सांगितले. कोरड्या दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर शासनाने पाच टप्प्यात पीककर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश दिलेले आहेत. वाशिम जिल्ह्यात अद्याप पीककर्ज पुनर्गठण सुरू झाले नसले तरी याबाबत ३५ टक्के शेतकरी आशावादी आहेत तर ६५ टक्के शेतकर्यांनी पीककर्ज पुनर्गठणाच्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. पेरणीच्या वेळी पीककर्ज पुनर्गठण होणे आवश्यक असल्याचे या शेतकर्यांनी सांगितले. एमआरपीनुसार खते व बियाण्यांच्या किंमती आकारल्या जात नसल्याचे ४३ टक्के शेतकर्यांचे म्हणणे आहे. ५७टक्के शेतकरी म्हणतात की एमआरपीनुसार किंमती आकारल्या जातात. राष्ट्रीयीकृत बँकांच्या पीककर्ज विलंबाबाबत ५४ टक्के शेतकरी नाराज असल्याचे दिसून आले. पीककर्ज वेळेवरच मिळायला हवे असे मत या शेतकर्यांनी नोंदविले आहे. शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई समाधानकारक नाही, असे ८८ टक्के शेतकर्यांना वाटते.