कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 15:50 IST2019-10-02T15:50:21+5:302019-10-02T15:50:25+5:30
देवराव सदाशिव शेळके या शेतकऱ्याने गावातगतच्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची २ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड - कर्जाला कंटाळून कारंजा तालुक्याती ग्राम खेर्डा बु. येथील देवराव सदाशिव शेळके या शेतकऱ्याने गावातगतच्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची २ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली .
खेर्डा बु. येथील शेतकरी देवराव सदाशिव शेळके (५२) यांच्याकडे ४ एकर शेती असून, दि.अकोला मध्यवती सहकारी बॅक लि.अकोला शाखा कामरगाव या बॅकेचे ३५ हजार रुपये कर्ज काढले होते. सततची नापिकीमुळे कर्जाची परतफेड कशी करावी, याची चिंता होती. याला कंटाळून १ आॅक्टोबर रोजी रात्री शेतावर जातो असे सांगुन ते घरून निघून गेले. राञी उशीरापर्यत घरी परत न आल्याने रात्री १० वाजता शोध घेतला असता ते सापडले नाहीत.अखेर २ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता गिट्टि खदाणच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळुन आला.