नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 15:53 IST2019-09-01T15:53:06+5:302019-09-01T15:53:08+5:30
रिसोड तालुक्यातील कुऱ्हा येथील शेतकरी सूर्यभान राजाराम नागरे (७५) यांनी १ सप्टेंबर रोजी स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) - सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून रिसोड तालुक्यातील कुऱ्हा येथील शेतकरी सूर्यभान राजाराम नागरे (७५) यांनी १ सप्टेंबर रोजी स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
कुऱ्हा येथील शेतकरी सूर्यभान राजाराम नागरे यांच्याकडे अडीचएकर जमिन असून, त्यांच्यावर अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ४० हजार रुपयांचे कर्ज आहे. सततच्या नापिकीमुळे कर्जाची परतफेड कशी करावी, या चिंतेने त्यांना ग्रासले होते. रविवारी सकाळी शेतात जातो असे म्हणून ते घरून निघून गेले. घरी लवकर न आल्यामुळे शेतात पाहणी केली असता, झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या पश्चात दोन मुले असून दोन्ही मुले त्यांच्यापासून विभक्त कुटुंबात राहतात. याबाबत रिसोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.