झेंडू फुलांचे दर घसरले; शेतकऱ्यांना आर्थिक फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 12:56 PM2020-11-18T12:56:15+5:302020-11-18T12:57:38+5:30

Washim Farmer News परजिल्ह्यातील झेंडू फुले जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकऱ्यांना अल्प दरात फुलांची विक्री करावी लागली.

The fall in marigold prices has hit farmers | झेंडू फुलांचे दर घसरले; शेतकऱ्यांना आर्थिक फटका 

झेंडू फुलांचे दर घसरले; शेतकऱ्यांना आर्थिक फटका 

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
धनज बु.: कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर यंदा धार्मिक कार्यक्रमांवर मर्यादा असल्याने शेतकऱ्यांनी झेंडू फुलांची लागवड कमी केली होती. तथापि, विजयादशमीला झेंडू फुलांची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांनी दिवाळीच्या सणाकडे आशेने पाहत उत्पादन वाढीसाठी या पिकावर खर्च केला; परंतु  ऐन दिवाळीच्या दिवशी परजिल्ह्यातील झेंडू फुले जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकऱ्यांना अल्प दरात फुलांची विक्री करावी लागली.
 दिवाळीला झेंडू फुलांची मोठी मागणी असते. यावर्षी पावसाळ्यात सतत पाऊस पडल्याने झेंडू फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी विजयादशमीला झेंडूच्या फुलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. दीडशे ते दोनशे रुपये किलो प्रमाणे झेंडूची फुले बाजारात विकली गेली. गेले. त्यामुळे दिवाळीनिमित्त झेंडू फुलाला मोठी मागणी राहण्याच्या आशेने शेतकरी उत्सािहत होते. 
व्यापाऱ्यांनीही शेतात जाऊन झेंडू फुले खरेदी  केेली;  परंतु  परजिल्ह्यातील  फुले जिल्ह्यात  दाखल झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसला. (प्रतिनिधी)

Web Title: The fall in marigold prices has hit farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.