ब्रोकर असल्याचे सांगून लाखोंचा गंडा
By संतोष वानखडे | Updated: September 22, 2022 18:48 IST2022-09-22T18:48:07+5:302022-09-22T18:48:59+5:30
आरोपीने एका कंपनीचा ब्रोकर असल्याचे सांगून फिर्यादीला विश्वासात घेत ९ लाखांची फसवणूक केली.

ब्रोकर असल्याचे सांगून लाखोंचा गंडा
वाशिम - एका कंपनीचा ब्रोकर असल्याचे सांगून कारंजा येथील अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या देविदास विश्वनाथ लटपटे (२४) या आरोपीला कारंजा शहर पोलिसांनी २२ सप्टेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास अटक केली. यासंदर्भांत कारंजा येथील सचिन रेवननाथ धस यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
आरोपीने एका कंपनीचा ब्रोकर असल्याचे सांगून फिर्यादीला विश्वासात घेत ९ लाखांची फसवणूक केली. तसेच कारंजा येथील अन्य काही जणांची याच पध्दतीने फसवणूक करून लटपटे याने ५२ लाख ३५ हजार ६०० रूपयांनी गंडा घातला. आरोपी देविदास लटपटे हा अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील राणेगाव येथील रहिवासी असून दाखल फिर्यादीवरून त्याचे विरूद्ध कारंजा शहर पोलिसांनी भादवीच्या कलम ४०६ व ४२० नुसार गुन्हा दाखल केला. आरेापीला ताब्यात घेतले असून, घटनेचा अधिक तपास ठाणेदार सोनोने यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक बी. सी. रेघीवाले व अमित भगत हे करीत आहेत.