हळद उकळणी यंत्राचा स्फोट ; दोन मजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 20:44 IST2021-03-02T20:43:39+5:302021-03-02T20:44:02+5:30
Explosion of turmeric boiling machine यंत्राचा स्फोट झाल्यामुळे शिरपुर येथील दोन मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना २ मार्च रोजी दुपारी घडली.

हळद उकळणी यंत्राचा स्फोट ; दोन मजूर जखमी
मुंगळा ( वाशिम) : मुंगळा येथे हळद उकळण्याचे काम सुरू असताना अचानक यंत्राचा स्फोट झाल्यामुळे शिरपुर येथील दोन मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना २ मार्च रोजी दुपारी घडली.
मुंगळा येथील संतोष राऊत यांच्या शेतात हळद उकळण्याचे काम सुरु होते. मात्र अचानक हळद उकळण्याच्या यंत्राचा स्फोट झाल्यामुळे दोन मजुर जखमी झाले. शिरपुर येथील दत्ता मानवतकर, आकाश देशमुख असे जखमी मजुराचे नाव आहे. अत्यत हलाखीची परिस्थिती या मजुरांची असल्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.