सायकलरिक्षा होतेय हद्दपार
By Admin | Updated: December 11, 2014 00:13 IST2014-12-11T00:13:37+5:302014-12-11T00:13:37+5:30
सायकलरिक्षाची छम.छम दुर्मिळ, सायकलरिक्षास्वारांवर उपासमारीची वेळ.
सायकलरिक्षा होतेय हद्दपार
शिखरचंद बागरेचा/वाशिम
छम.. छम.. छम.. छम.. अशा घुंगराच्या आवाजात प्रमुख रस्ते व गल्लीबोळीतून धावणारी सायकलरिक्क्षा आधुनिक युगातील ऑटोरिक्षांच्या भाउगर्दीमुळे काळाच्या ओघात संपूर्ण जिल्हय़ातूनच हद्दपार होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात लवकरच ही सायकलरिक्षा इतिहासजमा झाल्यास नवल वाटायला नको..!
काही वर्षापूर्वी जिल्हय़ात पाच हजाराचाच्याही पेक्षा जास्त संख्येत असलेल्या सायकल रिक्षांची संख्या कमी होवून सद्यस्थितीत फक्त पाचशेपर्यंत शिल्लक राहिली आहे. मागील पन्नास वर्षापासून जिल्हय़ातील प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण व स्वस्त असे साधन म्हणून जिल्हय़ातील रस्त्यावरुन गल्लीबोळात धावणार्या सायकलरिक्षा आता वर्तमान युगातील ऑटोरिक्षांच्या भाउ गर्दीत काळाच्या पडद्याआड जात असल्याचे चित्र दिसत असून काही वर्षापूर्वी जिल्हय़ात पाच हजाराच्यावर असलेल्या या सायकल रिक्षांची संख्या कमी होवून पाचशेच्या घरात आली आहे. त्यामुळे सदर व्यवसाय का करुन मजुरी मिळविण्याच्या सायकलरिक्षा चालकांवर उ पासमारीची पाळी आली आहे.
अनेक वर्षापासून वाशिम जिल्हय़ात रोख मजुरींचे साधन म्हणून सायकल रिक्षांचा व्यवसाय सुरु होता. मानवाचे ओझे मानवानेच ओढून इच्छित ठिकाणी स्वस्त व सुरक्षित पोहोचविण्याचे साधन म्हणजे लोकप्रिय ठरलेली अशीही सायकल रिक्षा आहे. शहरात अगदी स्वस्तामध्ये इच्छित ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची पहिली पसंती सायकलरिक्षांना होती. तर पेट्रोल डिझेल या महागड्या तेल इंधनाची गरज सायकल रिक्षांसाठी आवश्यक नसल्यामुळे रोख मजुरी देणारे साधन म्हणून सायकलरिक्षाचालक सुद्धा याला पहिली पसंती देत होते. जिल्हय़ातील वाशिम, कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड व मालेगाव या सर्व ठिकाणी सर्वत्र सुमारे पाच हजाराचचे वर सायकल रिक्षा होत्या. मात्र कालांतराने आधुनिक युगात पेट्रोल डिझेलवर चालणार्या ऑटोरिक्षा हे पर्यायी व जलदगतीचे साधन उपलब्ध झाल्यामुळे ऑटोरिक्षांच्या या भाउगर्दीत सायकल रिक्षा आता काळाच्या पडद्याआड जावू लागल्या. सद्य परिस्थितीत केवळ कारंजा शहरात सर्वाधिक सायकल रिक्षा प्रवाशांच्या सेवेत असून वाशिम शहरासह संपूर्ण जिल्हय़ात सायकलरिक्षांची संख्या केवळ पाचशेच्या घरात शिल्लक राहिली आहे.