शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

निधी खर्च करण्यासाठी कसरत

By admin | Updated: February 11, 2015 00:56 IST

वाशिम जिल्ह्यात पंचायत समिती स्तरावरील ५0 लाखावर निधी अखर्चित.

वाशिम : पंचायत समिती स्तरावरील विकासकामांना चालना मिळावी, याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने निधी देण्यात आला होता. जिल्ह्यातील पंचायत समित्या खर्च करण्यास अपयशी ठरल्याने शिल्लक निधी जिल्हा परिषदेमार्फत परत घेण्याचा ठराव झाला. हा निधी जिल्हा परिषदेला परत जाऊ नये, यासाठी कोणत्या गावात कोणती कामे करावयाची आहेत, याची माहिती पंचायत समिती स्तरावर घेणे सुरू झाले आहे. हे सर्व करताना एवढा मोठा निधी खर्च कसा करावा, यासाठी पंचायत समिती सभाप तींना मोठी कसरत करावी लागत आहे.जिल्हा परिषदेने पंचायत समिती व ग्रामपंचायतींना दिलेला निधी पंचायत समिती स् तरावर पडून आहे. तो पंचायत समितीने खर्च केला नाही. हा निधी १५ मार्चपर्यंंंंत खर्च करायचा असल्याने पंचायत समिती स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. कोणत्या गावातील रस्त्यासह विकासकामे यामधून करण्यात येऊ शकतात, याची चाचपणी सुरू झाली आहे. हा निधी खर्च न झाल्यास सर्व पंचायत समिती सभापतींनी तो जिल्हा परिषदेकडे पुनर्नियोजनासाठी परत पाठवावा, असा ठराव काल झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. हा ठराव झाल्याबरोबर जिल्ह्यातील सभेला उपस्थित पंचायत समिती सभापतींनी सदर निधी कोणत्या कामांवर खर्च केला जाऊ शकतो, यासह इतर माहिती अधिकारी वर्गाकडून प्राप्त करून घेतली आहे. याबाबत तर वाशिम पंचायत समितीचे सभापती यांनी कालच सभेतच सदर निधी कोणत्या कोणत्या कामावर खर्च करायचा आहे, याची माहिती सभागृहातच मागि तली होती. यावर अधिकर्‍यांनी सर्व सभापतींनी याची माहिती लेखी स्वरूपात देण्याचे सांगितले होते. सभा आटोपल्याबरोबर काही सभापतींनी याबाबत माहिती जाणून आवश्यक कागदपत्रेही घेतले आहेत. आपल्या पंचायत समितीला प्राप्त निधी खर्च करण्याचा मानस बर्‍याच सभापतींनी व्यक्त केला असून, मोठय़ा प्रमाणात असलेला निधी कसा खर्च करावा, यासाठी कसरत सुरू झाली आहे. प्रत्येक पंचायत समितीला जिल्हा परिषदेकडून प्राप्त निधीमध्ये जवळपास वाशिम १९ लाख, मालेगाव ८.६७ लाख, रिसोड नऊ लाख, कारंजा १५.७६ लाख, मंगरूळपीर ७.१५ लाख रुपयांचा समावेश आहे.