नारीशक्ती संवाद कार्यक्रम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:45 AM2021-08-19T04:45:26+5:302021-08-19T04:45:26+5:30

मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील आशाताई तायडे यांनी उत्कृष्ट ‘यशोगाथा ७५’ मध्ये भारतातून तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल पंचायत समिती ...

In the excitement of Nari Shakti Dialogue Program | नारीशक्ती संवाद कार्यक्रम उत्साहात

नारीशक्ती संवाद कार्यक्रम उत्साहात

Next

मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील आशाताई तायडे यांनी उत्कृष्ट ‘यशोगाथा ७५’ मध्ये भारतातून तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल पंचायत समिती सभापती शोभा वैजनाथअप्पा गोंडाळ व गटविकास अधिकारी एस.जी. कांबळे, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन तायडे यांचा सत्कार केला. तायडे यांनी कोरोनाच्या काळात दिव्यांग, विधवा, एकल महिलांना अन्नधान्य पुरविले व स्वतः मास्क तयार करून वेगवेगळ्या कार्यालयांत तथा रस्त्यावरील गरजूंना ते मोफत वाटप केले. त्याची दखल घेण्यात आली. यावेळी सहायक गटविकास अधिकारी पदमवार, पंचायत समिती उपसभापती, पं.स. सदस्य, उमेद अभियानाचे अकील शेख, राठोड, गणेश खोलगडे, प्रभाग समन्वयक, बचत गटातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन गणेश खोलगडे यांनी केले. प्रतिभा घुगे यांनी आभार मानले.

180821\img-20210817-wa0077.jpg

सत्कार

Web Title: In the excitement of Nari Shakti Dialogue Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.