शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारावर हल्ला करणारे जेरबंद

By admin | Updated: February 12, 2016 02:00 IST

बुधवारी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश.

वाशिम: अवैध रेती घेऊन जाणार्‍या ट्रकला अडविण्याचा प्रयत्न करणार्‍या नायब तहसीलदार व एका कर्मचार्‍याच्या अंगावर ट्रक घालून जीवघेणा हल्ला करणार्‍या दोघांना वाशिम शहर पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विद्यमान न्यायालयाने दिले. जिल्हय़ात अवैध रेतीची वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. चार फेब्रुवारी रोजी दुपारी एमएच २९ - ७११३ क्रमांकाचा अवैध रेती घेऊन जाणारा ट्रक वाशिमच्या पथकाने जप्त करून तहसील कार्यालय परिसरात उभा केला होता. ट्रकमालक सचिन श्रीमेवार व ट्रक चालक सोनू धोत्रे दोघेही रा. वाशिम यांच्याविरुद्ध अवैध गौण खनिज वाहतुकीचा दंड आदेश पारित करण्याबाबतची कारवाई सुरू असताना, ऑइल टँक लिंक असल्याच्या कारणावरून सदरचा ट्रक हा तहसील कार्यालय आवाराच्या बाहेर लावण्यास सांगण्यात आले. यासाठी ट्रकची चाबी दिली असता, ट्रकचालकाने ट्रक पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. सदर बाब नायब तहसीलदार राहुल वानखेडे यांच्या लक्षात येताच, त्यांनी कनिष्ठ लिपिक प्रमोद वानखेडे यांना सोबत घेऊन त्या ट्रकचा पाठलाग करण्याला सुरुवात केली. काटा रस्त्यावर असलेल्या पॉवर स्टेशनजवळ वानखेडे यांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र ट्रकचालक सोनू धोत्रे व मालक सचिन श्रीमेवार यांनी वानखेडे यांच्या अंगावर ट्रक नेऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वानखेडे जखमी झाले होते. दरम्यान, वानखेडे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७९, ३५३, ३३२, २७९, ३४ व सहकलम ११९, १७७, १३२, १७९, १८४ नुसार वाशिम शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा तपास ठाणेदार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मनोहर अष्टोनकर व सहकार्‍यांनी केला. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी विशेष पथक रवाना झाले होते. बुधवारी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.