जोडणी खंडीत केल्यानंतरही ग्राहकाला वीज देयक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:29 IST2019-02-04T16:29:15+5:302019-02-04T16:29:34+5:30
मंगरुळपीर (वाशिम): ४ डिसेंबर २०१८ मध्ये वीज जोडणी खंडीत केलेल्या वीजग्राहकाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील वीज वापराचे देयक आकारण्याचा प्रताप महावितरणकडून करण्यात आला आहे.

जोडणी खंडीत केल्यानंतरही ग्राहकाला वीज देयक
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम): ४ डिसेंबर २०१८ मध्ये वीज जोडणी खंडीत केलेल्या वीजग्राहकाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील वीज वापराचे देयक आकारण्याचा प्रताप महावितरणकडून करण्यात आला आहे. मंगरुळपीर उपविभागांतर्गत शहर विभागात हा प्रकार घडला आहे.
महावितरणच्यावतीने ग्राहकांना अवाजवी देयके आकारणे , वीज जोडणी देण्यापूर्वीच देयके आकारणे, कोटेशन भरल्यानंतही ग्राहकांच्या यादीत नाव नसणे, आदि प्रकार यापूर्वी घडले असताना आता वीज जोडणी खंडीत केल्यानंतरही वीज देयक आकारण्याचा नवाचा प्रकार होत असल्याचे दिसत आहे. मंगरुळपीर येथील शहरी भागातील विजय रामचंद्र खडसे, असे या ग्राहकाचे नाव असून, त्यांचा ग्राहक क्रमांक ३१६१२३७८७५०९ हा आहे. त्यांनी मंगरुळपीर उपविभागांतर्गत काही वर्षांपूर्वी वीज जोडणी घेतली होती. तांत्रिक कारणामुळे ४ डिसेंबर २०१८ रोजी त्यांची वीज जोडणी खंडीत करण्यात आली. त्यानंतरही डिसेंबर २०१८ या संपूर्ण महिन्यात ६० युनीट वीज वापरापोटी ४९३० रुपये, तर जानेवारी महिन्यात ५४८ युनिटच्या वीज वापरापोटी ६३२० रुपयांचे वीज देयक त्यांना देण्यात आले आहे. हा प्रकार पाहून वीजग्राहक थक्क झाला आहे. वीज जोडणी खंडीत झाल्यानंतरही सदर ग्राहकाच्या वीज वापराचा अंदाज कसा लावण्यात आला आणि आकारणी कोण्या आधारावर करण्यात आली, हा प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित होत असून, महावितरणची कार्यपद्धतीही यामुळे संशयाच्या भोवºयात सापडली आहे.