शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

वाशिम जिल्ह्यात तीन टप्प्यांत होणार  सरपंच पदांसाठी निवडणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 11:36 IST

Sarpanch Election सरपंचपदासाठी १५ ते १७ फेब्रुवारी, अशा तीन टप्प्यांत निवडणूक होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक संपल्यानंतर, आता सरपंचपदासाठी १५ ते १७ फेब्रुवारी, अशा तीन टप्प्यांत निवडणूक होत आहे. सदस्यांची पळवापळवी होऊ नये म्हणून काही पॅनलप्रमुखांनी सदस्यांना सहलीवर पाठविले, तर काही सदस्यांवर गावातच लक्ष ठेवले जात आहे. जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० यादरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान व १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. यामध्ये रिसोड तालुक्यातील ३४, मालेगाव ३०, कारंजा २८, मंगरूळपीर २५, वाशिम २४ आणि मानोरा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गजांना फटका बसला, तर काहींनी आपली पत राखली. २ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरावर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढल्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी महिला सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. आता सरपंचपदासाठी १५ ते १७ फेब्रुवारी, अशा तीन टप्प्यांत निवडणूक होणार असल्याने मोर्चेबांधणीला चांगलाच वेग आल्याचे दिसून येते. काही ठिकाणी सरपंचपदासाठी तीन, तीन प्रबळ दावेदार असल्याने पॅनलप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे. सदस्यांची पळवापळवी होऊ नये म्हणून सदस्यांना सहलीवरही पाठविले जात आहे, तर काही ठिकाणी सदस्यांवर गावातच लक्ष ठेवले जात असल्याचे दिसून येते. सरपंचपद मिळाले नाही, तर इच्छुक उमेदवार हे विरोधकांशी हातमिळवणी करण्याचा धोका नाकारता येत नसल्याने सदस्य सांभाळून ठेवताना पॅनलप्रमुखांची चांगलीच कसरत होणार आहे. १५ व १६ फेब्रुवारी रोजी सहाही तालुक्यात, तर १७ फेब्रुवारी रोजी मानोरा व मालेगाव तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. सरपंचपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कुणाला वेटिंगवर राहावे लागणार, याकडे राजकीय क्षेत्रासह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.  जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १५ ते १७ फेब्रुवारी, अशा तीन टप्प्यांत निवडणूक घेण्यात येत आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे.  १५ व १६ फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात तर १७ फेब्रुवारी रोजी मानोरा व मालेगाव तालुक्यात सरपंच पदाची निवडणूक होणार आहे.  

   - सुनील विंचनकरउपजिल्हाधिकारी (महसूल) वाशिम

टॅग्स :washimवाशिमsarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक