विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधण्याचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 11:42 IST2020-04-06T11:42:05+5:302020-04-06T11:42:18+5:30
विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधण्याचा प्रयत्न उमरी बु. शाळेत केला जातो.

विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधण्याचा प्रयत्न!
वाशिम : विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधण्याचा प्रयत्न उमरी बु. शाळेत केला जातो.
उमरी बु. येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शिक्षक व मुख्याध्यापकाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना गणितीय क्रिया चांगल्याप्रकारे करता याव्यात व दृढीकरण व्हावे यासाठी कृतीयुक्त अध्यापन, सर्व शैक्षणिक उपक्रमात माता-पालक लोकप्रतिनिधी यांना सहभागी, अप्रगत विद्यार्थी शोध घेऊन त्यांचा अध्ययन स्तर निश्चिती करणे, मूलभूत क्षमता प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्ययन-अध्यापन, स्पर्धा परीक्षांचे आयोजन करणे, पर्यावरण जागृती यासह सामाजिक उपक्रमही राबविले जातात. विशेषत: गणित व इंग्रजी विषय सोप्या पद्धतीने शिकवून विद्यार्थ्यांमध्ये या विषयाबद्दल गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
लोकसहभागातून भौतिक सुविधा
लोकसहभागातून भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. दीड लाख रुपये वर्गणी झाली होती. यामधून शाळेची रंगरंगोटी, भित्तीचित्रे व स्मार्ट टि.व्हि घेतला. सन २०१७-१८मध्ये शाळेला डिजिटल शाळेचा दर्जा मिळाला तसेच उत्कृष्ट शाळेचा पुरस्कारही मिळाला.
विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. शिक्षक, पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य दिले. विद्यार्थी हितासाठी शिक्षकही झटतात.
- उत्तम सोळंके, मुख्याध्यापक