शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

ई-निविदा व दर कराराच्या पेचात अडकल्या योजना!

By admin | Updated: February 12, 2016 02:01 IST

१२ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत काय तोडगा निघतो, याकडे अधिकारी-पदाधिका-यांसह दिग्गजांचे लक्ष.

संतोष वानखडे / वाशिम: मिनी मंत्रालय असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेच्या विविध योजना ई-निविदा आणि दर कराराच्या पेचात अडकल्या असून, १२ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत काय तोडगा निघतो, याकडे अधिकारी-पदाधिकार्‍यांसह दिग्गजांचे लक्ष लागून आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण आदी विभागाच्या योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचा निधी तसेच शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. या निधीतून साहित्य खरेदी केले जाते. साहित्य खरेदीसाठी ई-निविदा आणि दर करार (आरसी-रेट कॉन्ट्रॅक्ट) अशा दोन पद्धती आहेत. ई-निविदा प्रक्रियेत शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दरातही कंत्राटदार साहित्याचा पुरवठा करू शकतो. येथे कंत्राटदारांची स्पर्धा असल्याने शासनाच्या खर्चात बचत होऊ शकते, असा युक्तिवाद होत आहे; मात्र ही प्रक्रिया किचकट आणि लांबलचक असल्याने या प्रक्रियेला विरोध होत आहे. दुसरीकडे दर करारानुसार (आरसी) साहित्य खरेदी प्रक्रियेत शासनाने निश्‍चित केलेल्या दरानुसार साहित्याची खरेदी केली जाते. येथे स्पर्धक अल्प असल्याने साहित्य खरेदी प्रकरणात पारदर्शकता राहत नाही, असेही सांगितले जाते. कृषी, समाजकल्याण, शिक्षण, महिला व बालकल्याण विभागाच्या योजनेंतर्गतच्या साहित्य खरेदीसाठी दर करार की ई-निविदा हा मुद्दा अद्याप स्पष्ट झाला नाही. परिणामी, या योजना ठप्प आहे. शिलाई मशीन वाटप नाही, कृषी विभागाच्या साहित्याची खरेदी नाही. २0१५-१६ हे आर्थिक वर्ष संपायला अवघा दीड महिना शिल्लक असतानाही अनेक योजना ठप्प असल्याने मार्च एन्डिंगपूर्वी १00 टक्के निधी खर्च होईल का, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. मार्च २0१५ मधील शासन निर्णयानुसार १५ फेब्रुवारीपूर्वी साहित्य खरेदीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा सदर योजनेचा निधी अखर्चित या शीर्षकाखाली नोंद होऊ शकतो.