शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्यावेळी ग्रामस्थांनी केली जलसंधारणाची कामे

By admin | Updated: April 9, 2017 14:42 IST

कामांत उन्हामुळे अडथळा येऊ नये यासाठी हे ग्रामस्थ बहुतेक काम रात्रीच्यावेळीच बहुतांशी कामे करीत असल्याचे दिसत आहे.

दुष्काळमुक्तीचा ध्यास: कारंजा तालुक्यातील ७ गावाचे प्रयत्न वाशिम: पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या कारंजा तालुुक्यातील ७ गावचे ग्रामस्थ रात्रीच्यावेळीच लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करीत आहेत. कामांत उन्हामुळे अडथळा येऊ नये यासाठी हे ग्रामस्थ बहुतेक काम रात्रीच्यावेळीच बहुतांशी कामे करीत असल्याचे दिसत आहे. वॉटरकप स्पर्धेला प्रत्यक्षात ७ एप्रिलपासून सुरूवात होणार असताना कारंजा तालुक्यामधील गावांनी ६ एप्रिल रोजी आपला अर्ज सादर करून प्रवेश निश्चित केला. त्यानंतर ७ एप्रिलपासून या स्पर्धेला सुरुवात झाली असली तरी, त्यांनी ६ एप्रिलच्या मध्यरात्री जलसंधारणाची कामे सुरू केली आहेत. पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून पुरस्कार पटकावण्याचा नव्हे, तर या माध्यमातून गावातील दुष्काळाची समस्या कायमची मिटविण्याचा ध्यास या ७ गावच्या ग्रामस्थांना लागला आहे. असा उपक्र म राबविणाऱ्या गावांतील भुलोडा येथे एका रात्रीतून वृक्ष लागवडीसाठी २५० खड्डे खोदले, जयपूर येथील महिला पुरुषांनी रात्रभर घाम गाळून सीसीटीचे काम  केले. शिवण बु. येथे वृक्ष लागवडीसाठी ३०० खड्डे खोदण्यात आले. जानोरी येथे माती नाल्याचे काम करण्यात आले. हिंगणवाडी येथे नदीवर वनराई बंधाऱ्याच्या कामासाठी वृक्ष लागवडीचे खड्डे खोदण्यात आले. आखतवाडा येथे ग्रामस्थांनी ५०० वृक्ष लागवडीचे खड्डे खोदले, तर काकडशिवणी येथील ग्रामस्थांनी शेततळ्यातील गाळ उपशाचे काम केले. या गावांच्या कामाने प्रेरित होऊन आता इतरही गावे जलसंधारणाची झपाटल्यागत करीत आहेत.