००००००००००
ई-पीक पाहणी कार्यशाळा
मेडशी : येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी शेतकऱ्यांसाठी तहसीलदार रवी काळे यांच्या मार्गदर्शनात ई-पीक पाहणी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत जवळपास ३०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाला माजी पं. स. सभापती शेख गणीभाई हाजी शेख चांदभाई, सरपंच शेख जमीर शेख गणीभाई, उपसरपंच धीरज मंत्री, प्रदीप पाठक, नाना तायडे, ग्रा.पं. सदस्य मूलचंद चव्हाण उपस्थित होते.
०००००००००००००
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूर फवारणी
मेडशी : गेल्या काही दिवसांपासून गावात साथीच्या आजारांत वाढ होत आहे. ताप, सर्दी, खोकल्यासह डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण परिसरात वाढत असल्याने मेडशी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावात ठिकठिकाणी साफसफाई करण्यासह डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूर फवारणी केली जात आहे. शिवाय आरोग्यवर्धिनी केंद्राचे कर्मचारी घरोघर फिरून ग्रामस्थांच्या आरोग्याची माहिती घेत आहेत.