शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

फौजदारी कारवाईच्या धास्तीने सक्तीच्या रजेचा पवित्रा!

By admin | Updated: February 10, 2016 02:12 IST

प्रशासनाच्या गळचेप्या धोरणाला अभियंते कंटाळले.

सुनील काकडे /वाशिम: धडक सिंचन आणि नरेगांतर्गत मंजूर योजनेतून करण्यात येणार्‍या विहिरींचे १00 टक्के उद्दिष्ट पूर्ण करा; अन्यथा भारतीय दंड संहिता कलम १८८ अन्वये कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे. त्याविरोधात जलसंपदा विभागातील अभियंत्यांनी ह्यएल्गारह्ण पुकारला असून, कारवाई टाळण्यासाठी १0 फेब्रुवारीपासून ३१ फेब्रुवारीपर्यंंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे लेखी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाशिम लघूपाटबंधारे विभागांतर्गत येणार्‍या वाशिम, मालेगाव आणि रिसोडमध्ये एकंदरित ३४0 विहिरींची कामे करावयाची होती. त्यातून २३८ कामे पूर्ण झाली असून, २५ विहिरींची कामे रद्द झाली आहेत. धडक सिंचन योजनेत १६, तर ह्यनरेगाह्णमध्ये ६१, अशा ७७ विहिरी वर्ग करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९ फेब्रुवारीअखेर ७ विहिरींची कामे पूर्ण झाली असून, १५ कामे प्रगतीपथावर आहेत. २५ विहिरींची कामे सुरू झाली नसून, ३0 विहिरी रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. तद्वतच पाटबंधारे उपविभाग, कारंजा अंतर्गत येणार्‍या कारंजा, मंगरुळपीर आणि मानोरा या तीन तालुक्यांमध्ये ५६२ विहिरींची कामे करावयाची होती. त्यातून ३५0 कामे पूर्ण झाली. ५0 विहिरी रद्द करण्यात आल्या, तसेच २0 विहिरी धडक सिंचन योजनेत; तर १४२ विहिरी ह्यनरेगाह्णमध्ये अशा एकूण १६२ विहिरी वर्ग करण्यात आल्या. त्यापैकी ९ फेब्रुवारीअखेर ३७ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. २८ कामे प्रगतीपथावर आहेत, ८७ कामे अद्याप सुरु झाली नाहीत, तर १0 विहिरी रद्द करण्याचे प्रस्तावित असल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, लघुपाटबंधारे विभाग क्रमांक १, २ आणि ३ कडे शासनाने सोपविलेल्या सुमारे ४ हजार विहिरींपैकी आतापर्यंंंत या विभागाने सुमारे ३८00 विहिरींची कामे यशस्विरीत्या पूर्ण केली असताना केवळ २00 च्या आसपास अपूर्ण असलेल्या कामांबाबत दोषी ठरवून फौजदारी दाखल करण्याचा इशारा देणे कितपत योग्य आहे, असा सवाल संबंधित अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.