लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कारंजा ते अमरावती मार्गावर भडशिवणी फाट्याजवळ टाटा ४०७ वाहन उलटल्याने चालक गंभीर झाल्याची घटना १३ आॅक्टोंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान घडली. एम.एच. ३० ए.बी. १२४४ क्रमांकाचा टाटा ४०७ वाहन कारंजाहून अमरावतीकडे बी.एस.एन.एल. टॉवरचे साहित्य घेवून जात असतांना रस्त्यावरील मोठा खड्डा चुकविण्याच्या व समोरून येणाºया इंडिका वाहनाला वाचविण्याच्या नादात वाहन उलटले. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे काही काळ कारंजा ते अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कारंजा ग्रामीण पोलिसांनी क्रेनच्या साहायाने अपघातग्रस्त वाहन हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघातात जखमी झालेल्या चालकावर कारंजा ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर अमरावती येथे पुढील उपचाराकरिता रवाना करण्यात आले. घटनेचा पुढील तपास कांरजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनात कारंजा ग्रामीण पोलिस करीत आहेत.
वाहनाच्या अपघातात चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 19:50 IST
कारंजा ते अमरावती मार्गावर भडशिवणी फाट्याजवळ टाटा ४०७ वाहन उलटल्याने चालक गंभीर झाल्याची घटना १३ आॅक्टोंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान घडली.
वाहनाच्या अपघातात चालक जखमी
ठळक मुद्देभडशिवणी फाट्यानजीकची घटना वाहतूक ठप्प