पावसामुळे महामार्ग झाले घसरगुंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 16:40 IST2019-07-06T16:36:59+5:302019-07-06T16:40:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर ( वाशिम ): जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमुळे वाहनधारकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. अर्धवट ...

पावसामुळे महामार्ग झाले घसरगुंडी
ल ोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम): जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमुळे वाहनधारकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. अर्धवट पुलांमुळे पाऊस आल्यानंतर मार्ग बंद पडत असतानाच या महामार्गाच्या कच्च्या रस्त्यावर पावसामुळे चिखल तयार होत असल्याने वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे अपघाताची भिती वाढली आहे. वाशिम-मंगरुळपीर आणि शेलुबाजार-मंगरुळपीर दरम्यान हे चित्र पाहायला मिळत आहे.जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत चार राष्ट्रीय महामार्गांची कामे होत आहेत, तर एका मार्गाचे काम अद्याप सुरू व्हायचे आहे. सध्या सुरू असलेल्या महामार्गांमध्ये मंगरुळपीर-महान, वाशिम-मंगरुळपीर, कारंजा-मंगरुळपीर, मानोरा-मंगरुळपीर, मालेगाव-मेहकर या मार्गांचा समावेश आहे. या महामार्गांच्या कामासाठी कंत्राटदारांनी पूर्वीचे रस्ते खोदून सपाटीकरण केले आहे. हे करताना माती मिश्रीत मुरुमाचा मोठा वापर झाला आहे. त्यामुळे पाऊस आल्यानंतर मार्गावर चिखल तयार होऊन वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. यात दुचाकीसह चारचाकी वाहनेही घसरत असल्याने एखादवेळी समोरून येणाºया वाहनाला धडक लागून मोठा अपघात घडण्याची भिती निर्माण झाली आहे. वाशिम-मंगरुळपीर आणि शेलुबाजार मंगरुळपीरसह मानोरा-मंगरुळपीरदरम्यानच्या कामांवर वाहने घसरण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अभियंत्यांनी या प्रकारात जातीने लक्ष घालून कंत्राटदारांना कच्च्या रस्त्यावर खडी टाकून व्यवस्थित दबाई करण्याच्या सुचना देणे अत्यावश्यक झाले आहे. ----------------------