मोकाट कुत्र्यांनी घेतला हरीणाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 14:08 IST2018-10-27T14:08:24+5:302018-10-27T14:08:30+5:30

वाशिम: चाऱ्याच्या शोधात शिवारात भटकत असलेल्या हरीणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याचे लचके तोडले.

Dogs hunting antelope | मोकाट कुत्र्यांनी घेतला हरीणाचा बळी

मोकाट कुत्र्यांनी घेतला हरीणाचा बळी


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: चाऱ्याच्या शोधात शिवारात भटकत असलेल्या हरीणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याचे लचके तोडले. यात गंभीर जखमी झाल्याने हरणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार ते शेंदुरजना मोरे मार्गावर शनिवार २७ आॅक्टोबर रोजी घडली. 
शेलूबाजार ते शेंदुरजना मोरे मार्गावर चाºयाच्या शोधात फिरत असलेल्या हरीणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. ही माहिती मंगरुळपीर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सदस्यांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यापूर्वी परिसरातील काही लोकांनी जखमी हरीणाला उपचारासाठी पशूवैद्यकीय दवाखान्यात नेले; परंतु उपचारापूर्वीच हरीणाचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती वनविभागाला व मानद वन्यजीव रक्षकांना दिल्यानंतर वनविभागाने पंचनामा करून मृत हरीण शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले. शवविच्छेदनानंतर त्याला दफन करण्यात येणार असल्याने वन अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Dogs hunting antelope