शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत कोट्यवधींची उलाढाल!

By admin | Updated: November 1, 2016 00:02 IST

फटाका विक्रीतून लाखोंचा धूर; सोने-चांदी बाजाराला झळाळी!

वाशिम, दि. ३१- घराघरात, मनामनात आनंद घेऊन आलेल्या ह्यदिवाळीह्णला फटाके व सोने-चांदी विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल झाली. एकट्या वाशिम शहरात ३५ ते ४0 लाख रुपयांदरम्यान फटाक्यांची विक्री झाल्याचा दावा विक्रेत्यांनी केला.साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मानल्या जाणार्‍या दसर्‍याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात वाहन, घर, सोने-चांदी आदींमधून विक्रमी उलाढाल झाली होती. दिवाळीच्या उलाढालने हा विक्रम मोडीत काढला आहे. दिवाळीनिमित्तच्या खरेदीसाठी जिल्ह्यातील सर्वच शहरातील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. ग्राहकांची पसंत कॅश करण्यासाठी व्यापार्‍यांनीही विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध ठेवलेल्या आहेत. एकट्या दिवाळीच्या दिवशी वाशिम शहरातील फटाका बाजारात ३५ ते ४0 लाखांची उलाढाल झाल्याचे विक्रेत्यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.गतवर्षी दुष्काळ व आर्थिक मंदी असल्यामुळे दिवाळीच्या बाजारपेठेत फारशी उलाढाल झाली नव्हती. यावर्षी मात्र सुरूवातीपासून निसर्गाची साथ लाभल्याने सर्वांमध्येच नवचैतन्य आहे. सोयाबीनच्या एकरी उत्पादनात वाढ असली तरी बाजारभाव कोसळल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंता आहे. मात्र, दिवाळीच्या उत्साहावर विरजन नको, म्हणून शेतकर्‍यांनीदेखील दिवाळीच्या खरेदीत कंजूषी केली नसल्याचे दिसून येते. विशेष करून वाहने, कपडे, फटाके, इलेक्ट्रानिक्स वस्तु, सोने-चांदी आदींच्या खरेदीला ग्राहकांनी अधिक पसंती दिली, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.वाशिम येथील फटाका बाजारात जवळपास ४0 दुकाने थाटली होती. या दुकानांमधून शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात ३५ ते ४0 लाख रुपयांचे फटाके विकल्या गेले, असे विक्रेत्यांनी सांगितले. रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा या पाच शहरातील बाजारपेठेत सरासरी २0 लाख रुपयांच्या फटाक्याची विक्री गृहित धरता एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून येते. संपूर्ण जिल्ह्या सव्वा ते दीड कोटींच्या आसपास फटाका बाजारात उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला.