शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १९९ विहिरींचे होणार अधिग्रहण !

By admin | Updated: April 10, 2017 01:37 IST

वाशिम: संभाव्य पाणीटंचाईवर तात्पुरती उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १९९ गावांत १९९ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे.

वाशिम: संभाव्य पाणीटंचाईवर तात्पुरती उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १९९ गावांत १९९ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता त्या-त्या गावात विहीर अधिग्रहण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता नीलेश राठोड यांनी दिली.यावर्षी जिल्ह्यातील २६६ गावांत पाणीटंचाई जाणवणार असल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी कृती आराखड्यातील उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. सुरूवातीला तीव्र पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांमध्ये, जलसाठा असलेल्या विहिरींचे अधिग्रहण करून गावकऱ्यांना पाणी पुरविले जाणार आहे. वाशिम तालुक्यातील ३५ गावांत ३५ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. याप्रमाणे मालेगाव तालुक्यात ४० गावांमध्ये ४० विहीर अधिग्रहण, रिसोड तालुक्यात ४० गावांत ४० विहीर अधिग्रहण, मंगरूळपीर तालुक्यात २२ गावांत २२ विहीर अधिग्रहण, मानोरा तालुक्यात २५ गावांत २५ आणि कारंजा तालुक्यात ३७ गावांत ३७ अशा एकूण १९९ गावांत १९९ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांत विहीर अधिग्रहण करण्याची कार्यवाही सुरू झाली.