राज्यस्तरीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेसाठी रिसोड येथे  शनिवारी जिल्हा निवड चाचणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 13:08 IST2017-12-08T13:05:50+5:302017-12-08T13:08:39+5:30

वाशिम - राज्यस्तरीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेसाठी ज्युनिअर गटातील संघाची निवड करण्यासाठी ९ डिसेंंबर रोजी लोणी फाटा रिसोड येथील तायडे हेल्थ क्लबमध्ये निवड चाचणी होणार आहे.

District Selection Test on Saturday at Risod for State Level Lifting Competition | राज्यस्तरीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेसाठी रिसोड येथे  शनिवारी जिल्हा निवड चाचणी  

राज्यस्तरीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेसाठी रिसोड येथे  शनिवारी जिल्हा निवड चाचणी  

ठळक मुद्देवर्धा येथे १३ व १४ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पॉवर लिफ्टींग स्पर्धा होत आहेत.ज्युनिअर गटातील संघाची निवड ही रिसोड येथील चाचणीतून होणार आहे. कोणत्याही खेळाडूवर अन्याय होऊ नये यासाठी निवड चाचणीचा पर्याय ठेवण्यात आला आहे.

 

वाशिम - राज्यस्तरीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेसाठी ज्युनिअर गटातील संघाची निवड करण्यासाठी ९ डिसेंंबर रोजी लोणी फाटा रिसोड येथील तायडे हेल्थ क्लबमध्ये निवड चाचणी होणार आहे. वर्धा येथे १३ व १४ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पॉवर लिफ्टींग स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत जिल्ह्याचा संघ निवडायचा आहे. संघाची निवड करण्यासाठी तसेच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होऊ नये यासाठी निवड चाचणीचा पर्याय ठेवण्यात आला आहे. ज्युनिअर गटातील संघाची निवड ही रिसोड येथील चाचणीतून होणार आहे. ९ डिसेंंबर रोजी रिसोड लोणी फाटा येथील तायडे हेल्थ क्लबमध्ये होणाºया चाचणीमध्ये निवड झालेल्या संघाला राज्यस्तरीय स्पर्धसाठी पाठविल्या जाणार आहे. इच्छूक खेळाडूंनी व  जिल्हयातील पॉवर लिफ्टींग संघांनी ९ डिसेंबरला रिसोड येथील निवड चाचणीस उपस्थित राहावे, असे आवाहन वाशिम जिल्हा पॉवर लिफ्टींग असोसिएशनचे सचिव विनायक जवळकर, प्रशिक्षक नावेदखान, धनंजय तायडे, शेषनारायण देशमुख यांनी केले.

Web Title: District Selection Test on Saturday at Risod for State Level Lifting Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा