अनसिंगच्या महादेव मंदिरात शिवभक्तांना तीन क्विंटल उसळचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 15:26 IST2019-03-04T15:26:20+5:302019-03-04T15:26:38+5:30
अनसिंग (वाशिम) : दरवर्षीप्रमाणे यंदाही अनसिंग येथे चोळ्याच्या महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येत असून, यानिमित्त महाशिवरात्रीचा उपवास करणाºया भाविकांना सोमवारी तीन क्विंटल साबुदाण्याची उसळ वितरीत करण्यात आली.

अनसिंगच्या महादेव मंदिरात शिवभक्तांना तीन क्विंटल उसळचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
अनसिंग (वाशिम) : दरवर्षीप्रमाणे यंदाही अनसिंग येथे चोळ्याच्या महादेव मंदिरातमहाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येत असून, यानिमित्त महाशिवरात्रीचा उपवास करणाºया भाविकांना सोमवारी तीन क्विंटल साबुदाण्याची उसळ वितरीत करण्यात आली.
अनसिंग येथील चोळ्यातील महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या महादेव मंदिरावर दरवर्षी महाशिवरात्री उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो. यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. या मंदिरात दर्शनासाठी दूरवरचे शेकडो भाविक दिवसभर गर्दी करतात. सकाळी ६ वाजतापासूनच मंदिरावर दर्शनासाठी भाविकांची रिघ लागते. यंदाही येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महाशिवरात्रीनिमित्त दर्शन व अभिषेक करण्यासाठी मंदिरावर येणाºया भाविकांसाठी साबुदाणा उसळ तयार करण्यात आली होती. या मंदिरावर तब्बल तीन क्विंटलच्या साबुदाणा उसळीचे वाटप भाविकांना करण्यात आले. त्याशिवाय अनसिंग येथील विठ्ठल मंदिर, शृंगऋषी महाराज मंदिर या ठिकाणीही महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना साबुदाण्याच्या उसथळीचे वाटप करण्यात आले. शेकडो भाविकांनी या उसळीचा लाभ घेतला.