शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम  जिल्ह्यात रेशनच्या दुकानांमधून निकृष्ट डाळीचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 09:46 IST

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशनच्या दुकानातून अत्यंत निकृष्ट दर्जाच्या डाळीचे वितरण केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशनच्या दुकानातून अत्यंत निकृष्ट दर्जाच्या डाळीचे वितरण केले जात आहे. निकृष्ट डाळ विकत घेण्यास शिधापत्रिकाधारकांनी विरोध दर्शविला असून, दुसरीकडे ही निकृष्ट डाळ विकण्याची सक्ती रेशन दुकानदारांवर केली जात आहे.राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत संपूर्ण राज्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर गत दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात तुरीची खरेदी करण्यात आली. यातील काही तुरीची लिलावाद्वारे विक्री करण्यात आली, तर उर्वरित तुरीची भरडाई करून डाळीची विक्री स्वस्त धान्य दुकानांतून करण्याचा निर्णय शासनाने २८ नोव्हेंबर २०१८ रोजी घेतला. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाकडून तुरीची खरेदी करण्यात आली असल्याने तुरची भरडाई त्यांच्याकडून करून ही डाळ संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार उपलब्ध करून स्वस्तधान्य दुकानांतून विकण्यास सुरुवातही झालेली आहे. सुरुवातीला ५५ रुपये प्रति किलोदराने आणि प्रति शिधापत्रिकेवर एक किलोप्रमाणे ही डाळ स्वस्तधान्य दुकानांतून वितरीत करण्यात येत होती. मध्यंतरी या डाळीचे दर ३५ रुपये प्रति किलो करण्यात आले. त्यामुळे डाळ खरेदीला प्रतिसाद मिळाला. आता मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या डाळीचे दर पुन्हा ५५ रुपये प्रति किलो करण्यात आले. त्यातच शिधापत्रिकांवर मिळणारी ही डाळ अत्यंत निकृष्ट असल्याने शिधापत्रिकाधारक ते घेण्यास तयार नाहीत. या डाळीला किड लागल्याचेही काही ठिकाणी दिसत आहे. खाण्यात ही डाळ वापरल्यास आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भिती आहे. तथापि, स्वस्तधान्य दुकानदारांना ही डाळ विकण्याची सक्ती असल्याने त्यांचीही पंचाईत झाली आहे. निकृष्ट दर्जाची डाळ विकण्याची सक्ती कुणाकडून केली जात आहे? या प्रश्नाच्या खोलात जाण्याची गरज आहे. या गंभीर प्रकाराकडे पुरवठा विभागाने लक्ष देणे अपेक्षीत आहे.

जिल्ह्यात रेशन दुकानांत वितरीत करण्यात येत असलेली डाळ कशी आहे, त्याची तपासणी करण्याच्या सुचना तहसीलदारांना देण्यात येतील. शिधापत्रिकाधारकांनीही तूरडाळ निकृष्ट असेल, तर पुरवठा विभाग किंवा तहसीलस्तरावर तक्रार करून प्रशासनाला अवगत केल्यास दखल घेऊन तात्काळ पडताळणी करण्यात येईल.-देवराव वानखडेजिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पुरवठा करण्यात आलेली तूर डाळ निकृष्टदर्जाची असल्याने शिधापत्रिकाधारक ते घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे डाळ विकावी कुठे हा प्रश्न प्रामुख्याने ग्रामीण भागातील स्वस्तधान्य दुकानदारांसमोर उपस्थित होत आहे. पुरवठा विभागाने स्वस्तधान्य दुकांनासाठी उपलब्ध झालेले धान्य उतरविण्यापूर्वीच तपासणी करावी आणि ते निकृष्ट असल्यास परत पाठवावे, अशी आमची मागणी आहे.-तान्हाजी काळेजिल्हाध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार संघटना वाशिम

टॅग्स :washimवाशिम