शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

प्रलंबित मागण्यासांठी दिव्यांगांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 3:52 PM

मंगरुळपीर तालुक्यातील दिव्यांगांनी अन्नत्याग आंदोलनाचा पावित्रा घेतला असून, पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवार २५ फेब्रुवारीपासून या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला.

मंगरुळपीर पं.स.वर तळ: योजनांच्या प्रभावी अमलबजावणीची मागणीलोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर (वाशिम) : गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत शासन, प्रशासन उदासीन आहे. वारंवार निवेदन देऊनही त्यांच्या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मंगरुळपीर तालुक्यातील दिव्यांगांनी अन्नत्याग आंदोलनाचा पावित्रा घेतला असून, पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवार २५ फेब्रुवारीपासून या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला.  याबाबत जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनही पाठविण्यात आले आहे. राज्य  व केंद्र शासन दिव्यांगांसाठी विविध योजना आणत आहे; परंतु त्या योजनांच्या प्रभावी अमलबजावणीबाबत प्रशासन उदासीन असल्याने दिव्यांगांची मोठी हेळसांड होऊन ते योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. स्थानिकस्वराज्य संस्थांच्या अंदाजपत्रकात ५ टक्के निधी हा दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी खर्च करण्याची तरतुद आहे. तथापि, या निधीचाही पूर्णपणे वापर होत नसल्याची वस्तूस्थिती पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांत दिव्यांगांच्या नोंदणीबाबतही प्रचंड उदासीनता आणि दिरंगाई दिसून येत आहे. एवढेच नव्हे, तर लघुउद्योगासाठी दिव्यांगांना २०० फुट भूखंड देण्याचे शासन आदेश असतानाही त्याची अमलबजावणी होत नाही. शेकडो दिव्यांगांना पेन्शन वाढीचाही लाभ देण्यात आला नाही आणि घरकुल योजनेचा आराखडाही तयार केला नाही. अपंगत्वामुळे शारीरिक क्षमतेवर मर्यादा येत असल्याने दिव्यांगांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, मात्र त्याचीही दखल घेतली जात नाही,  अशा विविध समस्या दिव्यांगांनी जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेल्या निवेदनात नमूद केल्या आहे. या निवेदनावर दिव्यांग सेवा समिती विदर्भ अध्यक्ष सुभाष इंगोले मोबीसिंग राठोड यांच्यासह तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधवांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरagitationआंदोलन