धनगर आरक्षण आंदोलनाला सकल मराठा समाजबांधवांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 16:36 IST2018-08-13T16:35:39+5:302018-08-13T16:36:49+5:30
वाशिम - धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला वाशिम जिल्ह्यात सकल मराठा समाजबांधवांनी पाठिंबा दर्शविला.

धनगर आरक्षण आंदोलनाला सकल मराठा समाजबांधवांचा पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनालावाशिम जिल्ह्यात सकल मराठा समाजबांधवांनी पाठिंबा दर्शविला.
राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण अद्याप मिळालेली नाही. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे यासह सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव तातडीने देण्यात यावे, आरक्षणासाठी शहीद झालेल्या परमेश्वर धोंगडे यांच्या कुटुंबियाला २५ लाखाची तात्काळ आर्थिक मदत करावी, चोंडी व अंबड येथील धनगर समाजातील युवकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, धनगर समाजातील विद्यार्थांची थकीत शिष्यवृत्ती वाटप करावी, धनगर समाजातील मेंढपाळांना त्रास देणाºया वनरक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे आदी मागणीसाठी धनगर समाजबांधवांनी १३ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, मानोरा, मंगरूळपीर, शेलु बाजार, शिरपूर, वाकद यासह अन्य ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, धनगर आरक्षण आंदोलनाला सकल मराठा समाजबांधवांनी पाठिंबा दर्शवित वाशिम येथील आंदोलनस्थळी भेट दिली. धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे, अशी मागणीही सकल मराठा समाजबांधवांनी यावेळी केली.