शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

विकासात्मक कामे खोळंबली; वाकदवासियांचा रास्ता रोको

By संतोष वानखडे | Updated: June 26, 2024 18:37 IST

वाशिम : रिसोड तालुक्यातील वाकद ग्रामपंचायत प्रशासनाने गावात मुलभूत सुविधा न पुरविता घरकुल, सिंचन विहिर यांसह शासकीय लाभांच्या योजनांची ...

वाशिम : रिसोड तालुक्यातील वाकद ग्रामपंचायत प्रशासनाने गावात मुलभूत सुविधा न पुरविता घरकुल, सिंचन विहिर यांसह शासकीय लाभांच्या योजनांची प्रकरणेही अडकवून ठेवल्याचा आरोप करीत, याकडे वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी २६ जून रोजी वाकद बसथांब्यावर सकाळी १० ते १२ या वेळेत रास्ता रोको आंदोलन केले.पावसाळ्याचे दिवस असतानाही, वाकद ग्रामपंचायतने गावात स्वच्छतेची कामे केली नाहीत, जलजीवन मिशनच्या कामातही अडथळा निर्माण केल्याने गावकऱ्यांना भर पावसाळ्यातही दूरवरून पाणी आणावे लागत आहे. याशिवाय घरकुल, सिंचन विहिरींच्या फाईलदेखील अडवून ठेवल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. या गंभीर बाबीकडे पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावकरी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत उपसरपंचसह आठ सदस्यांनी बुधवारी (दि.२६) वाकद ते मेहकर रस्त्यावर सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत रस्ता रोको आंदोलन केले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धारही गावकऱ्यांनी केला. दरम्यान, पंचायत समितीच्या चमूने आंदोलनस्थळी भेट देवून ग्रामपंचायत स्तरावर पारित झालेले ठराव पंचायत समितीकडे पाठवा, त्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू तसेच गावातील घाणीचे साम्राज्य दूर सारून स्वच्छता अभियान राबवू, असे आश्वासन गावकऱ्यांना दिले. रास्ता रोको आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत उपसरपंचासह ८ सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्यावेळी रिसोड पोलीस स्टेशनच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला होता.पिण्यासाठी पाणी द्या हो...!वाकद गावातील जलजीवन मिशन योजनेचे काम बंद असल्याने गावकऱ्यांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. या योजनेचे काम त्वरित सुरू करून गावकऱ्यांना पाणी पुरविण्याच्या मागणीसाठी महिलांनीसुद्धा हंडे घेऊन या रास्ता रोको आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन