शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ जाहीर होवूनही कर्ज पुनर्गठणाचा प्रश्न प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:36 IST

रिसोड तालुक्यातील १०० गावांसह जऊळका आणि उमरी या महसूल मंडळातील ३५ गावांमधील शेतकरी दुष्काळी सुविधांसह पीक कर्ज पुनर्गठणापासूनही अद्यापपर्यंत वंचित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यातील ज्या गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला, तेथील शेतकऱ्यांना विविध स्वरूपातील सवलती लागू करून त्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करावे, असा निर्णय मध्यंतरी शासनाने जाहीर केला; मात्र जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील १०० गावांसह जऊळका आणि उमरी या महसूल मंडळातील ३५ गावांमधील शेतकरी दुष्काळी सुविधांसह पीक कर्ज पुनर्गठणापासूनही अद्यापपर्यंत वंचित आहेत.पर्जन्यमानात झालेली घट, खालावलेली भूजल पातळी यासह तत्सम बाबी लक्षात घेऊन राज्याच्या महसूल व वन विभागाने नोव्हेंबर २०१८ या महिन्यात राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ११२ तालुक्यात गंभीर आणि ३९ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. त्यात वाशिम जिल्ह्यातील एकमेव रिसोड तालुक्याचाही समावेश झाला होता. यासह मानोरा तालुक्यातील उमरी आणि मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे या महसूली मंडळांतर्गत येणाºया गावांमध्येही दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यानुषंगाने शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपांच्या वीजबिलात ३३ टक्के सवलत, शेतकºयांच्या मुलांना शुल्क माफी, रोजगार हमी योजनेत शिथिलता यासह संबंधित गावांमधील शेतकºयांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे शासनाचे निर्देश होते. प्रत्यक्षात मात्र रिसोड तालुक्यातील १०० व दोन महसूली मंडळांतर्गत येणाºया जवळपास ३५ गावांमधील शेतकºयांना ना सवलतीचा लाभ मिळाला ना त्यांच्या कर्जाचे पुनर्गठण होऊ शकले. यामुळे संबंधित शेतकºयांना चालू खरीप हंगामात नव्याने पीक कर्ज देखील मिळू शकले नाही. प्रशासन, शासनाच्या उदासिनतेमुळे शेतकºयांत तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.

३१ जुलै उलटूनही झाली नाही कार्यवाहीखरीप २०१८ च्या हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीची मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत होती. या मुदतीपर्यंत जे शेतकरी कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत, अशा शेतकºयांची संमती घेऊन पीक कर्जाचे व्याजासह मध्यम मुदत कर्जात पुनर्गठण करण्यात येणार होते. त्याची कार्यवाही बँकांनी ३१ जुलै २०१९ पर्यंत करून शेतकºयांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते; मात्र तसे झाले नाही. यासंदर्भात अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित बँकांना सूचना दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

खरीप पीक कर्ज वाटप केवळ २० टक्के!यावर्षी खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील १ लाख ९३ हजार ८९० शेतकºयांना १५३० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते; मात्र विविध स्वरूपातील अडचणींमुळे तथा बँकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने ३ आॅगस्टअखेर केवळ ३१८ कोटी अर्थात २०.७८ टक्केच पीक कर्ज वाटप होवू शकले.

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी