शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

रिसोड तालुक्यातील धरणग्रस्तांचा बुधवारी लघुपाटबंधारे कार्यालयावर महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 17:37 IST

वाशिम: रिसोड तालुक्यातील मौजे बोरखेडी प्रकल्पातील पुनर्वसीत गाव कौलखेड येथे विविध विकासकामे सुरु करण्यासाठी धरणग्रस्तांच्या वतीने ग्रा.पं. सदस्य देवराव मोरे यांच्या नेतृत्वात बुधवार १७ जानेवारी रोजी लघु पाटबंधारे कार्यालयात महामोर्चा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे रिसोड तालुक्यात असलेले मौजे बोरखेडी लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत गावकर्‍यांची जमीन सन २००५-०६ मध्ये संपादित करण्यात आली.बाधित झालेल्या धरणग्रस्तांनी अनेक वेळा संबंधीतांना निवेदने तसेच उपोषणाचा इशारा दिला होता; मात्र याची दखल प्रशासनाने अद्यापही घेतली नाही. बुधवार, १७ जानेवारी २०१८ रोजी कौलखेड वढव ग्रामपंचायत पदाधिकारी व धरणग्रस्तांच्या वतीने लघु पाटबंधारे कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येईल.

वाशिम: रिसोड तालुक्यातील मौजे बोरखेडी प्रकल्पातील पुनर्वसीत गाव कौलखेड येथे विविध विकासकामे सुरु करण्यासाठी धरणग्रस्तांच्या वतीने ग्रा.पं. सदस्य देवराव मोरे यांच्या नेतृत्वात बुधवार १७ जानेवारी रोजी लघु पाटबंधारे कार्यालयात महामोर्चा काढण्यात येणार आहे.

 रिसोड तालुक्यात असलेले मौजे बोरखेडी लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत गावकर्‍यांची जमीन सन २००५-०६ मध्ये संपादित करण्यात आली, तसेच गावठाणाचे पुनर्वसन करण्यात आले असून नवीन गावठाणाची निर्मिती करण्यात आली. या गावठाण गावाच्या विकासासाठी बाधित झालेल्या धरणग्रस्तांनी अनेक वेळा संबंधीतांना निवेदने तसेच उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र याची दखल प्रशासनाने अद्यापही घेतली नाही. त्यानंतर १९ सप्टेबर २०११ रोजी धरणग्रस्तांनी कौलखेड येथे उपोषण केले. त्या उपोषणाची दखल घेवून प्रशासनाने सदर गावाचा अहवाल तयार करुन अधिक्षक अभियंता, वाशीम पाटबंधारे मंडळ यांना पाठविला. या अहवालानुसार, पुनर्वसीत गाव कौलखेड येथील शाळेचे व पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दजार्चे झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. तसेच गावाकडे जाणार्‍या रस्त्याचेही काम निकृष्ट झाला असून या रस्त्यावर जातांना एक ते दोन फुट पाय फसत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. या गावातुन शाळेसाठी जाणार्‍या विद्यार्र्थ्यांना २किलोमिटर ऐवजी ९ किलोमीटर फेºयाने शाळेत जावे लागते. निकृष्ट रस्त्यामुळे शेतकरी शेतीत सुध्दा जावू शकत नाहीत. याबाबत २९ सप्टेंबर २०११ ला अधिक्षक यांनी दिलेल्या लेखी पत्रावर नमुद केले आहे की, गावठाणाचे पुनवर्सन करतांना प्रकल्पबाधीत शेतकर्‍यांना शासनाने कुठल्याच सुविधा पुरविल्या नाहीत. या समस्यांचे निवारण ३१ मे २०१२ पर्यत पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभागाने उपोषणकर्त्यांना दिले होते. तरी प्रकल्पातुन पुनर्वसीत झालेले गावठाणा मौजे कौलखेड येथे पाणीपुवठा, शाळा इमारत, समाजमंदिर, रस्ते, स्मशानभूमी, बाधित व्यक्तीच्या शेतीकडे जाणारे मार्ग, सार्वजनिक शौचालय व उघडी गटारे आदी विकास कामे येत्या १६ जानेवारी २०१८ पर्यत तात्काळ सुरु करण्याची मागणी धरणग्रस्तांनी केली असून कामे सुरु न झाल्यास येत्या बुधवार, १७ जानेवारी २०१८ रोजी कौलखेड वढव ग्रामपंचायत पदाधिकारी व धरणग्रस्तांच्या वतीने लघु पाटबंधारे कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येईल. असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर सरपंच अशोक सोनुने, उपसरपंच रेखा वाठोरे, सदस्य दत्तराव जायभाये, कुसुम घायाळ, राधा चाटे, कार्तीक तनपुरे, कमल सोनुने, दिपक सोनुने, विद्या वाठोरे, देवराव मोरे, मंगला खोडके,  सुनिता वाठोरे आदींसह धरणग्रस्त शेतकºयांच्या व गावकºयांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :washimवाशिमDamधरणagitationआंदोलन