रासायनिक खताचे भाव कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:42 IST2021-05-19T04:42:40+5:302021-05-19T04:42:40+5:30
निवेदनात म्हटले की,आंतरराष्ट्रीय बाजारात खतांसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याचे सांगून सर्वच कंपन्यांनी खताच्या किमतीत मोठी वाढ केली ...

रासायनिक खताचे भाव कमी करण्याची मागणी
निवेदनात म्हटले की,आंतरराष्ट्रीय बाजारात खतांसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याचे सांगून सर्वच कंपन्यांनी खताच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे याआधी १२०० रुपयाला मिळणारी डीएपी खताची गोणी आता १९०० रुपयाला घ्यावी लागणार आहे तर १०.२६.२६ खताचे दर ११७५ वरून १७७५ रुपये झाला आहे. २०.२०.१३ खताचे भाव ९७५ वरून १३५० झाले आहे. या बेसुमार दरवाढीमुळे पेरणी कशी करणार?असा प्रश्न शेतकरी यांना पडला आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ करण्याची मान्यता दिली नाही तरी खत कंपन्यांनी भाव वाढविणे अन्यायकारक आहे. खतांची दरवाढ रद्द करावी अन्यथा ‘मनसे’च्यावतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर मनोज खडसे, महादेव भस्में, ऋत्विक चव्हाण, सोनू इंगोले, ओम खोडके, उत्तम शिंदे यांच्या सह्या आहेत.