रस्ता व पुलाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 16:37 IST2018-06-19T16:37:16+5:302018-06-19T16:37:16+5:30
धनज बु.(वाशिम)- कारंजा तालुक्यातील माळेगाव ते अंबोडा रस्त्याचे दर्जोन्नतीचे काम मु्ख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत नुकतेच करण्यात आले. पहिल्याच पावसात पुलानजीक खड्डे पडल्याने तसेच पुलाच्या दोन्ही बाजू खाली दबल्या गेल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी गावकºयांनी मंगळवारी बांधकाम विभागाकडे केली.

रस्ता व पुलाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी
धनज बु.(वाशिम)- कारंजा तालुक्यातील माळेगाव ते अंबोडा रस्त्याचे दर्जोन्नतीचे काम मु्ख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत नुकतेच करण्यात आले. पहिल्याच पावसात पुलानजीक खड्डे पडल्याने तसेच पुलाच्या दोन्ही बाजू खाली दबल्या गेल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी गावकºयांनी मंगळवारी बांधकाम विभागाकडे केली.
ग्राम सडक योजनेंतर्गत माळेगाव ते अंबोडा या ६.२०० किमी अंतर रस्त्याचे काम करण्यात आले. रस्त्यादरम्यान असलेल्या नदीवर सात गाळ्यांचा पुल उभारणे प्रस्तावित असताना, पाच गाळ्यांचाच पुल तयार करण्यात आला, असे नागरिकांनी तक्रारीत म्हटले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचे काम करताना दर्जेदार साहित्याचा वापर केला नसल्याने पहिल्याच पावसात पुलाचे दोन्ही बाजूकडील भाग हे दिड ते दोन फुट दबला आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात पुलानजीक आणखी खड्डे पडण्याची भीती वाहनधारकांमधून वर्तविली जात आहे. आताचा पुलाच्या दोन्ही बाजू दबल्या गेल्याने, संभाव्य पावसात या दोन्ही बाजू पुलापासून अलग होण्याची भितीही वर्तविण्यात येत आहे. या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून तपासणी व चौकशी करावी तसेच पुलाची दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.