‘एसटी’मधून मालवाहतुकीचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 15:44 IST2020-06-20T15:44:34+5:302020-06-20T15:44:53+5:30
शिरपूर, केशवनगर येथे माल उतरविण्यात आला.

‘एसटी’मधून मालवाहतुकीचा श्रीगणेशा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : खासगी वाहतूक बंद असल्याने व्यापाºयांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने ट्रकमधून मालवाहतूक सुरू केली. अकोला येथून मालवाहतूक करणारा पहिला ट्रक २० जून रोजी अकोला ते जिंतूर या मार्गावरून धावला असून, शिरपूर, केशवनगर येथे माल उतरविण्यात आला.
अकोला गॅरेजमधून किराणा व इतर सामान भरून एसटीची मालवाहतूक शिरपूर, केशवनगर, रिसोड, सेनगाव, जिंतूर मार्गावर सुरू झाली. शनिवारी चालक नरेंद्र बोपटे हे या मार्गावर पहिली फेरी घेऊन शिरपूर येथे आले. येथील माल उतरवून पुढे केशवनगर, रिसोड, सेनगाव, जिंतूरकडे वाहन रवाना झाले. वाहनात माल भरण्यापूर्वी व त्यानंतर वाहन सॅनिटाईज केले जात असल्याचे चालक बोपटे यांनी सांगितले. एसटीच्या माल वाहतुकीमुळे व्यापाºयांना मोठा दिलासा मिळाला.